राज ठाकरे म्हणाले, ‘मनसैनिकांच्या काळजीपोटी अयोध्या दौरा रद्द केला; शिव्याही खायल्या तयार..’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पुण्यातील सभेत अयोध्या दौऱ्याबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या सभेआधीच अयोध्या दौरा तूर्तास स्थगित अशी पोस्ट राज ठाकरेंनी ट्विटरवर टाकली होती. त्यात त्यांनी असंही म्हटलं होतं की, पुण्यात या सविस्तर बोलू. त्यामुळे राज ठाकरे याबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. अखेर आपण दौरा फक्त मनसे कार्यकर्त्यांच्या काळजीपोटी हा दौरा रद्द केला असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरेंनी असा दावा केला की, ‘आपल्या सगळ्यांना अडकविण्यासाठी हा सगळा सापळा रचला गेला होता. म्हणून मी दौरा रद्द केला. मी जात नाही म्हटल्यावर चार शिव्या पण खायल्या पण मी तयार आहे. माझ्यावर टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनी दौरा रद्द करण्याचं नेमकं कारण काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘अयोध्या दौरा तूर्तास रद्द.. अनेकांना वाईट वाटलं.. अनेकांना आनंद झालं, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले. म्हणून मी दोन दिवसांचा जरा बफर दिला होता मुद्दामून. काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेन. ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकरची घोषणा केली त्यानंतर मी पुण्यात अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसातच हे सगळं प्रकरण सुरु झालं. की, अयोध्येला येऊ देणार नाही.’

‘मग ते सगळं वाढत होतं. मी ते सगळं पाहत होतो. काय चाललंय नेमकं. मला मुंबई, दिल्लीमधून देखील माहिती मिळत होती. मला उत्तर प्रदेशातून देखील काही गोष्टी लोकं सांगत होते. की नेमकं काय चाललंय. एक वेळ अशी लक्षात आली की, हा संपूर्ण ट्रॅप आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे.’

ADVERTISEMENT

‘कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली त्याची रसद पोहचवली गेली ज्या गोष्टी गेल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालीए. की, पुन्हा विषय बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून सगळा आराखडा आखला गेला.’

ADVERTISEMENT

‘मी उद्या समजा तिथे हट्टाने जायचं असं ठरवलं असतं मला माहिती आहे की, आपल्या पक्षामधील हजारो आपले महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रातून अनेक हिंदू बांधव हे तिकडे अयोध्येला आले असते. तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं गेली असती अंगावर.’

MNS: पुण्यात राज ठाकरे कोणावर बरसले?, फक्त ‘हे’ 15 मुद्देच वाचा!

‘तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं. हकनाक काही कारण नसताना तुमच्यावर अनेक केसेस आणि जेलमध्ये जाणं आणि त्या केसेस पुन्हा तिकडे चालवणं आणि तो ससेमिरा जेव्हा तुमच्या पाठीमागे लावला असता ना.. हे नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर बसले आहेत. मी त्यांच्याशी बोलत होतो.. मी त्यांना म्हटलं की, आपली पोरं मी अशी हकनाक घालवणार नाही.’

‘त्या वेळेला सर्व पदाधिकारी बरोबर येणार होतेच. या सगळ्यांवर तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला त्या गोष्टी लावल्या असत्या आणि निवडणुकीच्या वेळी इकडे कोणीच उरलं नसतं. हा सगळा सापळा होता.’

‘एक कोण तरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का ओ? या सगळ्या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. अशा काही गोष्टी आहेत की, मला तुम्हाला सांगता पण येणार नाही. मला काही बोलता पण येणार नाही.’

‘पण ही माझी महाराष्ट्रातील ताकद हकनाक तिकडे सापडली असती. ती मला सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं जात नाही म्हटल्यावर चार शिव्या पण खायल्या पण मी तयार आहे. माझ्यावर टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे. पोरं नाही अडकू देणार मी.’ असं कारण देत राज ठाकरे यांनी दौरा रद्द करत असल्याची नेमकी काय भूमिका होती हे स्पष्ट केलं.

आता राज ठाकरे यांच्या या दाव्याबाबत विरोधक आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT