"मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की...'' एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
I swear by God ..." Eknath Shinde Chief Minister, Devendra Fadnavis Deputy Chief Minister of maharashtra
I swear by God ..." Eknath Shinde Chief Minister, Devendra Fadnavis Deputy Chief Minister of maharashtra

महाराष्ट्रात २१ जूनला राजकीय भूकंप झाला. त्यानंतर या राजकीय नाट्याचा शेवट कुठे होतो ते पाहणं महत्त्वाचं होतं. नाट्याचा शेवट झाला तो उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ही जोरदार चर्चा होती. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात एकनाथ शिंदे यांनाही बोलवण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडून जाहीर करण्यात आलं. मी या सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसेन असंही त्यांनी सांगितलं.

मात्र या शपथविधीच्या नाट्यात खरा ट्विस्ट एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला काही वेळ उरलेला असतानाच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होणार हे समोर आलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलं आहे?

एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे. हे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं होतं की मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही. त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणालेत जे. पी. नड्डा?

"महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीनंतर त्या राज्यातले नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावं. भाजपचं स्थान या सरकारमध्ये राहावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असं म्हटलं आहे."

देवेंद्र फडणवीस यांनी आमची विनंती मान्य केली आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील हे जे. पी. नड्डा यांनी सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या जनतेबाबत वाटणारं त्यांचं प्रेमच य़ा निर्णयातून दिसून येतं आहे असंही जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in