१४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गर्जना

जाणून घ्या आणखी काय काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
१४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गर्जना

१४ मे रोजी अनेकांचा मास्क काढणार आहे अशी गर्जना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. थापा मारणारे खूप असतात मात्र चांगलं काम केल्यानंतर कौतुकाची थाप मारणारे खूप कमी असतात. पाणी देण्याच्या कार्यक्रमात कोणतंही राजकारण करणार नाही मात्र १४ मे रोजी मी अनेकांचा मास्क काढणार आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला सुनावलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुंबई महापालिकेने सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर केलं आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारखं वाटतं आहे. मी माईकसमोर मास्क काढला आहे, तसा मास्क मास्क १४ तारखेलाही काढणार आहे. कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करू पाहात नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात राजकारण आणायचं नाही. १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार आहे." असं म्हणत त्यांनी भाजप आणि मनसेला सुनावलं आहे.

१४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गर्जना
'भाजपचं हिंदुत्व गाढवाने पांघरलेल्या वाघाच्या कातड्यासारखं'-उद्धव ठाकरे

२ एप्रिलला राज ठाकरेंची सभा मुंबईत पार पडली त्यानंतर १२ एप्रिलला त्यांनी उत्तरसभा घेतली. तसंच १ मे रोजीही सभा घेतली. त्या सभेत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तर दुसरीकडे १ मे रोजी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती त्यात त्यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपणही लवकरच सभा घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्या सभेची तारीख ठरली आहे. १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत आणि उत्तर देणार आहेत.

आजच्या कार्यक्रमात आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"आज विचारांचं प्रदूषण झालं आहे, हे प्रदूषण दूर कऱण्याची गरज आहे. मुंबईची रचना समुद्रसपाटीपासून खाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असतं. आपण आत्तापर्यंत अनेक प्रयत्न केले आहेत तरीही पाणी तुंबतं हे सारखं दाखवलं जातं. हिंदमाता परिसर तुंबणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बाकीचे थापा मारणारे खूप आहे पण कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत."

६५ वर्षांपूर्वी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले एक नेते होते. त्यांचे सुपुत्र तुम्हाला माहित आहेत. त्यांचे सुपुत्र आम्ही. आमचे सुपुत्र आदित्य ठाकरे. मुंबईत होणारे बदल हे बघत बघत आम्ही मोठे झालो आहोत. मुंबईची काळजी आम्हाला आहेच. हल्ली झालंय असं की पर्यावरणाच्या गोष्टी आपण करतो, पण त्यातही असं आहे की जे चांगलं केलं आहे त्याबद्दल फार बोललं जात नाही. नळातलं पाणी दाखवलं जात नाही मात्र मुंबई तुंबली आहे ते दाखवायचं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in