Deepak Kesarkar : बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊत यांना शिवसेनेतून हाकलून दिलं असतं

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चुकीचं बोलणं थांबवलं पाहिजे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे
Deepak Kesarkar : बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊत यांना शिवसेनेतून हाकलून दिलं असतं

गुवाहाटीत गेलेले एकनाथ शिंदे यांच्या गटाने संजय राऊत आणि त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देत आज ते असते तर संजय राऊत यांना शिवसेनेतून बाहेर काढलं असतं असं म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले आहेत दीपक केसरकर?

''या देशातले जहाल प्रवक्ते संजय राऊत हे ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत ती काही योग्य नाही. आमचा एकच बाप आहे, तुमचे अनेक बाप आहेत असं म्हणत आहेत. हा एका महिलेचा अपमान आहे. हा महिलेचा अपमान शिवसेनेत सहन केला जातो हे विशेष आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी संजय राऊत यांना शिवसेनेतून बाहेर काढलं असतं. आम्हाला प्राण्याची उपमा संजय राऊत देत आहेत, या प्राण्यांच्या जिवारच तुम्ही राज्यसभेत गेलात ना. राजीनामा द्या, परत निवडणूक लढवा ना तुम्हाला फक्त ४१ मतं हवी आहेत.''

''संजय राऊत यांच्याकडे नैतिकता आहे का? ती असेल तर आमच्या गटातल्या लोकांनी तुम्हाला मतदान केलंय हे विसरू नका. त्यांची सद्सद् विवेक बुद्धी जागृत आहे का? मला शंका आहे. असा प्रवक्ता कुणालाही मिळू नये. शिवसेनेने एक चांगला प्रवक्ता द्यावा. जर हे बोलत राहिले तर संपूर्ण भारतात वेगळा विचार तसंच संदेश जाईल'' असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांना तुम्ही संजय राऊत यांच्याबाबत सांगितलं की नाही? असं विचारलं असता की वारंवार सांगितलं गेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पान टपरी चालवणाऱ्यांनाही आमदार बनवलं. भाजी विकणाऱ्यांनीही आमदार केलं. पण अशा शिवसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या . १७ १७ केसेस या शिवसैनिकांच्या अंगावर आहेत. हे मूळ शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवलेले आहेत. मी जसा बाहेरून आलो तसे संजय राऊतही बाहेरून आलेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहित नसाव्यात. त्यामुळे ते आता आमदारांविषयी अशी चुकीची भाषा वापरत आहेत. लोकप्रभा की चित्रप्रभासाठी लिहित होते. त्यानंतर ते इथे आले होते.

संजय राऊत यांच्याबद्दल आम्ही आदर बाळगून आहोत म्हणून आम्ही उत्तरं देत नाही. मात्र ते शिवसेनेच्या आमदारांबाबत संजय राऊत यांनी चुकीची वक्तव्यं आहेत. आमच्याबद्दल वाटेल ते बोलत आहेत. मी त्यांना चिडवण्यासाठी सांगत नाही पण कुठल्याही पक्षाला असा प्रवक्ता मिळू नये. पक्षासाठी रक्त आटवणाऱ्यांची हा माणूस नाचक्की करतो आहे हे थांबलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांना सांभाळत होते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची फरफट करण्यासाठी संजय राऊत यांनी भूमिका निभावली आहे असाही आरोप दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in