"त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती"

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्याकडून सोमय्यांवरील हल्ल्याचं समर्थन, राणा दाम्पत्यालाही लगावला टोला
"त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती"

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनच्या बाहेर झालेल्या हल्ल्यावरुन भाजप नेत्यांनी मविआ सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. किरीट सोमय्या भाजप आमदारांच्या शिष्ठमंडळासह केंद्रीय गृहसचिवांकडे या प्रकरणाची तक्रार करायला गेले होते.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. सोमय्या काय त्या गाडीत जर मोदी असते तरीही ती गाडी शिवसैनिकांनी फोडली असती असं विधान सय्यद यांनी केलं आहे. त्या खोपोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

ज्यावेळेला ही घटना घडली तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर त्या कारमध्ये मोदी असते तरीही ती कार शिवसैनिकांनी फोडली असती. तुम्ही तिकडे गेलाच कशाला होता? असा सवाल सय्यद यांनी केला आहे.

"त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती"
Navneet Rana : नवनीत राणांचा गंभीर आरोप; मुंबई पोलीस आयुक्तांनी 'व्हिडीओ'च दाखवला

खासदार नवनीत राणा यांना पोलीस कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याच्या गोष्टीवरही सय्यद यांनी भाष्य केलं. "न्यायालयीन कोठडीमध्ये तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलची ट्रिटमेंट मिळत नाही हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला कोठडीत नेल्यावर तुम्ही म्हणत असाल की मला फाईव्ह स्टारची थाळी द्या, गुलाबजाम द्या तर असं होणार नाही. जी वागणूक बाकीच्या लोकांना दिली जाते तिच तुम्हालाही दिली जाणार", असं म्हणत सय्यद यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला.

"त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती"
नवनीत राणांना कोठडीत हीन वागणूक देण्यात आली? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले....

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज जामीनासाठी सत्र न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. परंतू सत्र न्यायालयानंही सरकारी वकीलांना याप्रकरणी तीन दिवसांची वेळ देत जामीनावरील सुनावणी २९ एप्रिल रोजी केली जाईल असं म्हटलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं निश्चित झालं आहे.

"त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती"
Rana Couple: राणा दाम्पत्याला तूर्तास तुरुंगातच राहावं लागणार, कोर्टाकडून दिलासा नाहीच!

Related Stories

No stories found.