सरकार पडण्याच्या वल्गना होत असताना, ठाकरे सरकारने आजच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही वेळापुर्वी भाषण करुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. त्यात मुख्यमंत्र्यांनी गायब आमदारांना आणि राज्यातील जनतेला भावनीक साद घातली आहे. मी राजीनामा द्यायला तयार आहे फक्त माझ्या समोर येऊन सांगा असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला आव्हान दिले आहे. एकीकडे सरकार पडण्याच्या वल्गना होत असताना दुसरीकडे आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गृहखातं, अर्थखातं, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्री बैठकीत ४ मुख्य निर्णय घेण्यात आले आहेत.

1) करमाळा, कळंब येथे न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2) अर्थखात्यामध्ये अर्थ व सांख्यिकीमध्ये अपर संचालक पद निर्माण करण्याची मान्यता मंत्रीमंडळ बैठकीत झालेला आहे.

3) गृहखात्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय त्याचबरोबर राजकीय, सामाजिक आंदोनातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

4) सहकार खाते- कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणार.

ADVERTISEMENT

असे महत्त्वाचे निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आता एका बाजूला राज्यात सरकार पडेल का असे वाटत असताना सरकारने हे मोठे निर्णय घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात काय म्हणाले…

शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही म्हणून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सगळे अयोध्येला गेले. हिंदुत्वावर विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही अशीही बातमी पसरवण्यात आली. त्यात काहीही तथ्य नाही. २०१४ ला ६३ आमदार निवडून आले तेदेखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. शिवसेना बाळासाहेबांचीच आहे.. पण मधल्या काळात जे मिळालं ते याच शिवसेनेमुळे.

शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन एकमेकांमध्ये गुंफलेले शब्द आहे. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे हे शिवसेना प्रमुखांनाही सांगितलं होतं. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे बोलण्याची आत्ताची वेळ नाही. शिवसेना बाळासाहेबांची नाही असं भासवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाली आहे. त्या आणि आत्ताच्या शिवसेनेत काय फरक आहे? मी बाळासाहेब ठाकरेंचेच विचार पुढे नेतो आहे. २०१४ ला आपण एकटे लढलो होतो.

२०१४ लाही आपण हिंदूच होतो आजही आहे, उद्याही राहणार. २०१४ ला ६३ आमदार निवडून आले त्यानंतर जे मंत्री झाले ती शिवसेनाही बाळासाहेब ठाकरेंच्या नंतरचीच शिवसेना होती. त्यानंतरची आत्तापर्यंतची वाटचाल पाहा. आत्ता मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत जे काही सहकारी मंत्रिमंडळात आहेत तेदेखील त्याच बाळासाहेबांचे सहकारी आहेत. बाळासाहेबांचीच शिवसेना हवी असं म्हणणाऱ्यांनी जे काही मधल्या काळात मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही माझ्यावर विश्वास दाखवला. अशात मी माझ्या लोकांना म्हणजेच शिवसेनेतल्याच लोकांना मी नको असेन तर काय करायचं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी नकोत असं सांगितलंत तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. तुमचा विश्वास नसेल तर मी आजच माझा मुक्काम वर्षा निवासस्थानावरून मातोश्रीवर हलवतो. जे काही बोलायचं आहे ते समोर येऊन बोला, आडून आडून का बोलायचं आहे. असे प्रश्न आज उद्धव ठाकरे यांनी विचारले आहेत

    follow whatsapp

    ADVERTISEMENT