"२०१९ ला उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून हिंदुत्व निघून गेलं त्यामुळेच.." राणेंचा घणाघात

हिंदुत्वाचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि दुकान चालवायचं हेच तर शिवसेनेने केलं असाही आरोप नारायण राणेंनी केलं
"२०१९ ला उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून हिंदुत्व निघून गेलं त्यामुळेच.." राणेंचा घणाघात
फोटो सौजन्य-समीर शानबाग

२०१९ ला उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून हिंदुत्व निघून गेलं त्यामुळे त्यांनी भाजपसोबत विश्वासघात केला अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाषणाला जी गर्दी झाली होती त्यातले ८ ते १० हजार लोक हे तर बांद्रा येथील फेरीवाले होते त्यांना ३०० रूपये देऊन आणलं होतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हिंदुत्व टोप्या घालून येत नाही, ते डोक्यात असावं लागतं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांना आज नारायण राणेंनी उत्तर दिलं आहे.

"२०१९ ला उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून हिंदुत्व निघून गेलं त्यामुळेच.." राणेंचा घणाघात
नारायण राणे म्हणाले 'उभं राहायलाही दोन माणसं लागतात'; उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन

मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. मी बाळासाहेब ठाकरेंचे विचार, हिंदुत्व, मराठी माणसाविषयीची आस्था आम्ही सगळं जवळून पाहिलं आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता परखडपणे बोलणारे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणणार. बाळासाहेब ठाकरे जे सांगायचे तसंच वागायचे आहे. १५ मे च्या सामनामध्ये जी काही वाक्यं आली आहेत त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री काय बोलू शकतात? कुठल्या भाषेत बोलू शकतात? याचा अंदाज येतो.

आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं, घर पेटवणारं नाही. असं वाक्य बोलले नसतं तर चाललं असते. अडीच वर्षात किती चुली पेटवल्या? किती बेरोजगारांना रोजगार दिले याचं उत्तर द्या. किती रोजगार आणले? किती मराठी मुलांना, मुलींना नोकऱ्या मिळाल्या ते सांगावं. आज केंद्र सरकारने किती नोकऱ्या दिल्या त्याची माहिती आली. मात्र हे सभा घेऊन सांगतात आम्ही नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांना मदत करणार हे सगळं अजून सांगतच आहेत. महानगरपालिकेच्या कारभारात भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे.

"२०१९ ला उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून हिंदुत्व निघून गेलं त्यामुळेच.." राणेंचा घणाघात
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे- नारायण राणे

कोरोनात १ लाख ६० हजार लोकांचा मृत्यू झाला तरीही सरकार पाठ थोपटून घेत आहेत. नाले ७५ टक्के स्वच्छ व्हायला हवेत मात्र ३७ टक्के झाले आहेत. दिशा सालियनचा संसार उद्ध्वस्त केला. पूजा चव्हाणचं काय झालं? हा सगळा ढोंगीपणा सुरू आहे. अडीच वर्षात काय काय केलं? ते सांगा ते काही न सांगता फक्त शिव्या द्यायला. शिवसेनेच्या वाटचालीत पहिल्या ३५ वर्षात उद्धव ठाकरे दिसले का? मी साक्षीदार आहे. ते कुठेही नव्हते.

हिंदुत्व डोक्यात असायला पाहिजे टोपीत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. मग २०१९ ला उद्धव ठाकरेंच्या डोक्यातलं हिंदुत्व कुठे होतं? ते निघून गेलं म्हणूनच त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. भाजपचा विश्वासघात असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावर टीका केली. हे यांना शोभतं का? जरा आरसा घ्या आणि स्वतःकडे बघा. त्यानंतर दुसऱ्यांवर टीका करा असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या अंगावर आम्ही गेलो म्हणून तुम्ही आज मुख्यमंत्री आहात हे विसरू नका असंही उद्धव ठाकरेंना नारायण राणेंनी सुनावलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in