उस्मानाबाद, सोलापूरमध्ये IT च्या धाडी : आमदार कैलास पाटील यांच्या भाच्याच्या उद्योगामध्ये झाडाझडती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुरुवारी पहाटेपासून सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि साखर कारखानदारांच्या व्यवसायावर इनकम टॅक्स विभागाच्या धाडी सुरु आहेत.पंढरपूर मधील साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उस्मानाबाद येथील साखर करण्यासह पंढरपूर येथील ऑफिस व घरी इन्कम टॅक्स पुणे विभागाचे अधिकारी दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. पहाटेपासून ही कारवाई सुरु आहे.

साखर कारखानदारी क्षेत्रातलं कमी काळात मोठं नाव असलेल्या खाजगी पाच व एक सहकारी साखर कारखाना चालवणारे अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून साखर कारखान्यांची व ऑफिस व घराची तपासणी सुरु आहे.

कोण आहेत अभिजित पाटील?

अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत.त्यांच्या ताब्यात 5 कारखाने आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक आणि नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अभिजित पाटील आहेत आमदार कैलास पाटलांचे भाचे

कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेने आमदार कैलास पाटील हे नात्याने अभिजित पाटील यांचे मामा लागतात. कैलास पाटील यांनी सुरतेहून परत येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याच भाच्याच्या उद्योगांवर आयकर विभागाच्या कारवाईने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

कृषी अभ्यास शिबिराचे बोर्ड गाडीवर लावून आयकर विभागाची धाड

ADVERTISEMENT

कृषी अभ्यास शिबीर 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट असा बोर्ड लावून आयकर विभागाची गाडी धाराशिव साखर कारखाना येथे धाड टाकण्यासाठी आली आहे, या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार 30 ऑगस्ट पर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे.

ADVERTISEMENT

5 गाड्यात जवळपास 20 च्या वर अधिकारी हे अभिजीत पाटील यांच्या विविध संस्थाची चौकशी करीत आहेत. यात पुणे व दिल्ली येथील काही अधिकारी यांचा समावेश आहे. जालना येथे आयकर विभागाचे अधिकारी यांनी राहुल वेड्स अंजली असे स्टिकर गाडीला लावून धाड टाकण्यासाठी आले होते. आता उस्मानाबाद येथे कृषी अभ्यास शिबिराचा फंडा वापरला असल्याचे दिसते.

ऑक्सिजन निर्मिती करणारा देशातील पहिला कारखाना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्मिती करण्याचे आवाहन केले होते. त्यादरम्यान वाढत्या ऑक्सीजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन ऑक्सीजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित केला होता. त्यावेळी हा कारखाना मोठ्या चर्चेत आला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT