"महाविकास आघाडी सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी?"अबू आझमींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

जाणून घ्या काय म्हटलं आहे अबू आझमी यांनी?
"महाविकास आघाडी सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी?"अबू आझमींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
Abu Azami's letter to CM Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सपा नेते आणि आमदार अबू आझमी यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याक समाजासाठी काय केलं? असा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी ज्याची चर्चा उद्धव ठाकरे हल्ली फारवेळा करतात ते एकदा सांगाच असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे अबू आझमी यांनी?

"महाविकास आघाडी सरकार सेक्युलर आहे की या सरकारचा चेहरा हिंदुत्ववादी आहे? ज्याची चर्चा हल्ली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असतात हे एकदा स्पष्ट सांगावं. एवढंच नाही तर महाविकास आघाडी स्थापन होऊन अडीच वर्षे होऊन गेलंतरीही अल्पसंख्याक समुदायाच्या समस्यांबाबत काय केलं? हे सांगावं."

"महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही मुस्लिमांचे कोणते प्रश्न सुटले? ५ टक्के रिझर्व्हेशन, हज कमिटीच्या सीईओची नियुक्ती , मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना, वक्फ बोर्ड स्थापन करणं, उर्दू अकादमी, अल्पसंख्याक विभागाचा विकास, अल्पसंख्याक समुदायाचे व्यवसाय जसे की पॉवरलूम, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न, अल्पसंख्याक समुदायासाठीची धार्मिक स्थळं, त्यासाठी मिळणारं बजेट अशा सगळ्या मुद्द्यांचं काय झालं? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे."

Abu Azmi letter to CM Uddhav Thackeray
Abu Azmi letter to CM Uddhav Thackeray

अबू आझमी पुढे म्हणाले की महाविकास आघाडी सरकार सेक्युलर ही या सरकारचा चेहरा हिंदुत्ववादी आहे हेदेखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं पाहिजे. आज काल उद्धव ठाकरे कायमच हिंदुत्वाच्या गोष्टी करत असतात मात्र सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर आधारीत आहे. मी या मागण्या करत आधीही पत्र लिहिलं होतं. मात्र त्याचं उत्तरही तुम्ही दिलेलं नाही असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in