'मशिदींपेक्षा मातोश्री जास्त पवित्र आहे?' विचारत ओवेसींची ठाकरे सरकारकडे मोठी मागणी

जाणून घ्या असदुद्दीन ओवेसींनी ठाकरे सरकारकडे काय मागणी केली आहे?
'मशिदींपेक्षा मातोश्री जास्त पवित्र आहे?' विचारत ओवेसींची ठाकरे सरकारकडे मोठी मागणी

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जर हनुमान चालीसा पठण करणार असेल तर राजद्रोह होतो. मग आमच्या मशिदी? त्यांचं काय? मातोश्री आमच्या मशिदींपेक्षा जास्त पवित्र आहेत का? असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीकेचे बाण चालवले आहेत.

'मशिदींपेक्षा मातोश्री जास्त पवित्र आहे?' विचारत ओवेसींची ठाकरे सरकारकडे मोठी मागणी
शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

मी अशा (राज ठाकरे ) प्रकारच्या छिछोऱ्या लोकांची भाषणं ऐकत नाही. मी औरंगाबादमध्ये होतो. तिथे आमच्या पक्षातले लोक आहेत. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज ठाकरेंनी जे भाषण केलं ती सरळ सरळ हिंसेला दिलेली चिथावणीच होती. एकदा होऊनच जाऊद्या म्हणजे काय? एक माणूस अवघ्या राज्याची शांतता पणाला लावणार का? असा सवाल एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबई तकला दिलेल्या खास मुलाखतीत विचारला आहे.

खासदार असदुद्दीन ओवेसी.
खासदार असदुद्दीन ओवेसी.

औरंगाबादमध्ये हिंदू मुस्लिम, दलित बांधव यांच्यात जो सलोखा आहे तो भंग करण्याचा प्रयत्न होतो आहे. एकदा पोलिसांनी यामध्ये लक्ष घालावं. १५३ कलम लावून राज ठाकरेंना अटक करून तुरुंगात धाडावं म्हणजे कळेल त्यांना की आपण काय बोललं पाहिजे आणि काय नाही. जरा जेलमध्ये जाऊन येऊ दे म्हणजे कळेल. शिवसेनेचे सरकार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे भावाच्या विरोधात कारवाई करत नाहीत. नवनीत राणा हनुमान चालीसा म्हणायला येणार होतीत तर तुम्ही त्या दोघांना अटक केली आणि राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला.

तुमचा भाऊ बोलतो आहे, वायफळ बडबड करतो आहे. तरीही तुम्ही गप्प का बसले आहेत? औरंगाबादचा तुम्हाला खरगोन बनवायचं आहे का? काँग्रेस राष्ट्रवादी का गप्प बसले आहेत? हेच त्यांचं सेक्युलर धोरण आहे का? असाही सवाल ओवेसींनी विचारला आहे.

राज ठाकरेंनी पोलिसांना तात्काळ भोंगे बंद करण्यास सांगितलं
राज ठाकरेंनी पोलिसांना तात्काळ भोंगे बंद करण्यास सांगितलं

राज ठाकरे म्हणत आहेत की हा धार्मिक मुद्दा नाही, हा सामाजिक मुद्दा आहे. त्याबद्दल काय सांगाल असं विचारलं असता ओवेसी म्हणाले की, ''राज ठाकरे कायदा हातात घेऊ पाहात आहेत. कायदा तुम्ही हातात कसा घेत आहेत? तुम्ही कोण आहात? तुम्ही कायदा हातात घेणार तो कोणत्या अधिकाराने? उत्तर प्रदेशीयांना मारून मारून आपल्यासाठी जागा बनवण्याचं तुमचं स्वप्न भंगलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहात. राज ठाकरेंचा भाऊ मुख्यमंत्री आहे त्यामुळेच तुमची एवढी हिंमत झाली. कुणीही कुणाच्या विरोधात नाही. दोन्ही भाऊ एकत्र आहेत.' असाही दावा ओवेसींनी केला आहे. '

'मशिदींपेक्षा मातोश्री जास्त पवित्र आहे?' विचारत ओवेसींची ठाकरे सरकारकडे मोठी मागणी
'बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना हिंदूंचे ओवेसी व्हायची घाई', राज ठाकरेंवर बोचरी टीका

मशिदीचं नाव घेऊन तुम्ही म्हणत आहात की हनुमान चालीसा पठण करणार आहात हे कायद्याचं उल्लंघन नाही का? महाविकास आघाडी सरकार हे आंधळं, बहिरं आणि मुकं सरकार आहे. या सरकारला रमजान ईदच्या आधी आम्हाला खुलेपणाने धमकी दिली जाते आहे तरीही सरकार काही करत नाही? याचा अर्थ काय समजायचा? असाही प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे.

राज ठाकरेंना हिंदू ओवेसी म्हटलं जातं आहे. संजय राऊत रोज हा आरोप करत आहे हे विचारलं असता, ओवेसी म्हणाले की संजय राऊत यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव घेण्याची हिंमत नाही त्यामुळे ते असे प्रकार करत आहेत. हिंमत असेल तर राज ठाकरेंचं नाव घेऊन दाखवा. सत्तेत असताना तुम्हाला धमकी दिली जाते आहे तरीही तुम्ही गप्प का बसले आहात? ही सगळी या सगळ्यांची मिलीभगत आहेत. मातोश्रीसमोर राणा दाम्पत्य येऊन हनुमान चालीसा म्हणणार होते तर राजद्रोह लावला गेला. आता राज ठाकरे खुलेआम धमकी देत आहेत तरीही गप्प का? तुम्हाला तुमच्या घराचं महत्त्व आहे मग आमच्या मशिदीचं महत्त्व नाही का? तुमची आता दातखिळ बसली आहे का? असाही प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे.

Related Stories

No stories found.