‘दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा’ : हे शब्द राज्यगीतामधून वगळले का?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jai Jai Maharashtra Maja song by shahir Sable:

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Maja) गीताला महाराष्ट्राचं (Maharashtra) राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. मंगळवारी (३१ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली होती. (Jai Jai Maharashtra Maja declare as the state anthem of Maharashtra)

वादाला सुरुवात :

एका बाजूला या गीताची राज्यगीत घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला या गीतावरुन वादाचीही सुरुवात झाली आहे. या राज्यगीताला वेळमर्यादा असल्यानं या गीतामधील काही शब्दांना कात्री लावण्यात आली आहे. पण कात्री लावलेले हे शब्द “दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा” असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. दिल्लीतील काही भाजप नेत्यांना हे वाक्य अडचणीच ठरणार असल्यानेच ते गीतामधून वगळ्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे यांनी सुधाकर जाधव यांच्या पोस्टचा आधार घेत केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं सत्य काय? “दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा” हे शब्द वगळले का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयने मंगळवारी (३१ जानेवारी) हा निर्णय जाहीर केलेल्या ट्विटमध्ये “दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा” हे शब्द वगळले नसल्याचं दिसून येतं. जी दोन चरण स्वीकारण्यात आली आहेत, त्यामध्ये “दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा” या शब्दांचा उल्लेख आढळून येतो. तसंच आज वाद झाल्यानंतही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयने या गीताची कॉपी पुन्हा एकदा प्रसिद्ध केली.

ADVERTISEMENT


महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (३१ जानेवारी) रोजी ट्विट केलेलं राज्यगीत :

मूळ गाणं कसं आहे?

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

जय जय महाराष्ट्र माझा …

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा …

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा …

नेमकं कोणतं कडवं वगळलं?

याच मूळ गाण्यातील या तीन कडव्यांपैकी वेळ मर्यादेमुळे “रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा…” हे पहिलं कडवं वगळण्यात आलं आहे. मात्र दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा हे वाक्य असलेलं कडवं कायम ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील काही मार्गदर्शक सूचना असणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे :

१) शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे

ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.

२) १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले

जाईल.

3) राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा / प्रार्थना / राष्ट्रगीत

यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.

4) राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था,

खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक

कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास

मुभा राहील.

5) राज्यगीत सुरु असतांना सर्वानी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान

करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती

यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.

6) राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा

बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

7) वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बॅडमार्फत वाजविता येईल.

8) राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील

शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.

9) या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त

आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.

10) माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार / प्रसार करण्यासाठी

विशेष मोहिम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच

समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.

11) या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या

संकेत स्थळावर उपलब्ध राहील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT