Viral: 'आमचं पाकीट दे रे भौ...' एका मताची किंमत तब्बल 5 लाख?

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात एका मताची किंमत पाच लाख रुपये असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. यात एक व्हायरल व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीनंतर पैसे वाटपावरुन वाद
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीनंतर पैसे वाटपावरुन वाद (प्रातिनिधिक फोटो)

मनीष जोग, प्रतिनिधी (जळगाव)

Jalgaon District Co-operative Milk Union: जळगाव: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सध्या 'आमचं पाकीट दे रे भौ' हे वाक्य चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे. जळगाव जिल्ह्यातील भालोद या गावातील भांडणाचा हा व्हिडिओ स्थानिक अहिराणी आणि मराठी मिश्र भाषेत असल्याने कमालीचा व्हायरल होत आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon District Cooperative Milk Union Election) मिळालेल्या पैशाचा वाटणी वरून गावागावात चांगलीच भांडण लागली आहेत. त्याच हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. (jalgaon district co operative milk union discussion that one vote is worth five lakh rupees video of fight in village sparked a new discussion)

गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ निवडणूक झाली. या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे पॅनल होते. यात गिरीश महाजन यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला.

दोन दिग्गज नेत्याच्या लढाईत, पैशाची उधळपट्टी झाली याची दबक्या आवाजात चर्चा होती. एका मताची किंमत पाच लाख रुपये असल्याचं देखील बोललं गेलं. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 15 वर्षापूर्वी अशाच पद्धतीने जवळपास 100 कोटी खर्च झाल्याची चर्चा होती. त्यानंतर दूध संघाची निवडणूक देखील आता चर्चेत आली आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गावाचा दूध संघाच्या सर्वसंमतीने एक प्रतिनिधी मतदान करतो. व्हायरल व्हिडीओत ज्या प्रतिनिधीला गावातल्या दूध संघाने मतदानाचा अधिकार दिला, त्या मतदाराने पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप, त्याच गावातील दूध संघ आणि इतर सभासद करीत आहेत.

'ठरल्याप्रमाणे मतदानासाठी जे पैसे आलेत, ते आपापसात वाटून घ्यावे अस ठरलेलं असताना, तुम्ही 5 लाख रुपये एकट्याने ठेऊन घेतले. यातील आमचा हिस्सा दे.' अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

त्याच वेळी मतदार म्हणतो मी पैसे घेतले नाहीत. यावर इतर सदस्य म्हणतात 'तू शंभर रुपयासाठी स्वतः टेंडर भरतो, टॉयलेटला जातो तिथेही पैसे घेतो, तू एवढा मोठा पैसा सोडणार नाही? असं तावातावाने सगळे भांडत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

यावेळी तक्रारदार म्हणतो की 'गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याकडून आलेले पैसे कुठे गेले?'

त्यावर मतदान केलेला व्यक्ती म्हणतो की, 'मला मिळाले नाही, तुम्ही पैसे मागा.' यावर दूध संघाचे सदस्य म्हणतात, 'आपला ठराव झाला होता, मतदान केल्यावर जे पाकीट मिळेल ते दूध संघात जमा होईल, ते सर्व सदस्य वाटून घेतील.'

या व्हिडीओमधील भांडण हे आता चव्हाट्यावर आलं आहे. पण गावागावात हाच वाद दबक्या आवाजात सुरू आहे. पण 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' अशीच अवस्था सर्वत्र आहे .

जळगाव जिल्हा दूध संघात 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी महाजन गटाने खडसे गटावर केला होता. पण हा व्हिडिओ समोर आल्यावर दोन कोटींच्या भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निवडणुकीत 20 कोटींचा चुराडा झाला अशा शेलक्या शब्दात जळगावकर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in