‘एक घाव, दोन तुकडे केले नसते, तर…’; संतोष बांगर हल्ला करणाऱ्यांवर भडकले, सांगितलं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली

उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी घडला. या घटनेनंतर आमदार संतोष बांगरांनी गाडीवर चालून आलेल्यांना चिवसैनिक असं हिणवत प्रत्युत्तर दिलंय. ‘मुंबई Tak’शी बोलताना बांगरांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दरम्यान, या घटनेनंतर संतोष बांगरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फोन केला होता.

शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर टीका करणारे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीच शिंदे गटाला जाऊन मिळाले. तेव्हापासून संतोष बांगर चर्चेत आहेत. संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, कारण ठरलंय अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी येथे झालेला हल्ला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेवर आता संतोष बांगरांनी भूमिका मांडलीये. घटनाक्रम सांगतानाच संतोष बांगरांनी हल्ला करणाऱ्यांना आव्हानही दिलंय. पत्नी आणि बहीण नसती, तर एक घाव, दोन तुकडे केले असते, असं विधान बांगरांनी घटनेनंतर केलंय.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला, ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

ADVERTISEMENT

संतोष बांगर अमरावतीतल्या अंजनगाव सुर्जी येथे कशाला गेले होते?

“मी देवदर्शनासाठी गेलो होतो. माझी पत्नी आणि बहीण माझ्यासोबत होती. दर्शन झाल्यानंतर महाराजांनी आम्हाला गेटच्या बाहेर सोडलं. तिथे दहा-पाच लोक आले, त्यांनी नारेबाजी केली. मीडियावाले, सोशल मीडियावाले हल्ला आहे म्हणताहेत. हल्ला कशाला म्हणतात? छातीवर जर कुणी वार करत असेल, तर त्याला हल्ला म्हणतात. हा भ्याड हल्ला आहे”, असं संतोष बांगरांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

“मी मागच्यावेळी सुद्धा म्हणालो होतो, माझ्या गाडीच्या काचाला टच करून दाखवा. मग तुम्हाला सांगेन की मर्दानगी काय असते? आजही माझं चॅलेंज आहे. माझ्या गाडीच्या काचाला टच करून दाखवलं, तर हा शिवसेनेचा आमदार (संतोष बांगर) राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही”, असं आव्हान आमदार संतोष बांगर यांनी दिलंय.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला, ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

माझी पत्नी आणि बहीण गाडीत नसती, तर याच लोकांना संतोष बांगर काय आहे, ते यांना कळून चुकलं असतं. एक घाव, दोन तुकडे केले नसते, तर संतोष बांगरने बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून घेतलं नसतं. आताचा हल्ला हा चोरी करण्यासारखा आहे. त्यांनी डाका टाकल्याप्रमाणे आले, असते तर खरे मर्द मावळे म्हटलं असतं. हे चिवसैनिक आहेत. समोर येऊन दाखवा, संतोष बांगर दोन हात केल्याशिवाय राहिला नसता.

गाडीवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे संतोष बांगरांना फोन करून काय म्हणाले?

अमरावतीतल्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संतोष बांगर यांना फोन केला. संतोष बांगरांनी याला दुजोरा दिला असून, बांगर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. त्यांनी माझ्याकडून घटनेची माहिती घेतलीये. ते जे आदेश मला देतील, त्याचं पालन करेन. मी अजून तक्रार दाखल केलेली नाही. मला वरून आदेश आला, तर माझ्या गाडीचा चालक किंवा सुरक्षारक्षक तक्रार दाखल करतील”, असं संतोष बांगर यांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT