Karnataka CM : सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात कोण? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Karnataka CM : सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात कोण?
बातम्या राजकीय आखाडा

Karnataka CM : सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात कोण?

the swearing-in ceremony of Karnataka Chief Minister-designate Siddaramaiah and Deputy Chief Minister DK Shivakumar today.

Siddaramaiah chief minister oath ceremony : अखेर आज कर्नाटकात नवे सरकार अस्तित्वात येत आहे. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या राज्याचे 30 वे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटकमध्ये 13 मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. काँग्रेसने 135 जागा जिंकल्या. तर भाजपने 66 आणि जेडीएसने 19 जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा गाठल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री निवडण्यासाठी दीर्घ विचारमंथन केले. त्यानंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यावर शिक्कामोर्तब झालं. नव्या सरकारमध्ये डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. निवडणुकीनंतर काँग्रेस कर्नाटकात तिघांना उपमुख्यमंत्री करणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, डीके शिवकुमार हे एकटेच उपमुख्यमंत्री असणार आहे.

राज्यपालांसमोर सरकार स्थापन करण्याचा दावा

सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. सिद्धरामय्या डीके शिवकुमार यांच्यासोबत 25-26 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये डीके आणि सिद्धरामय्या यांच्या गटातील निष्ठावंत आमदारांचा समावेश असेल. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत कर्नाटकच्या काँग्रेस प्रभारींनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सिद्धरामय्या यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर सहमती दर्शवत सर्व आमदारांनी सिद्धरामय्या यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. यानंतर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

सिद्धरामय्या दुपारी 12.30 वाजता शपथ घेणार

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. कांतीरवा स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या मंगळवारपासून अधिकारी कामाला लागले आहेत. काँग्रेसलाही या शपथविधीतून विरोधी एकजूट दाखवायची आहे, अशा स्थितीत पाहुण्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. स्टेडियमवर पोहोचल्यानंतर डीके यांनी शपथविधीच्या तयारीचा आढावाही घेतला.

हे मंत्री शपथ घेऊ शकतात

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात 25 ते 26 मंत्री शपथ घेऊ शकतात. मात्र, केवळ 10 जणांची यादी समोर आली आहे. परमेश्वरा, रामलिंगा रेड्डी, केजे जॉर्ज, एचके पाटील, एमबी पाटील, सतीश जारकीहोली, यूटी कधर, लक्ष्मी हेब्बाळकर, टीबी जयचंद्र, एचसी महादेवप्पा हे मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस मंत्रिमंडळाची यादी तयार करत असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा >> 2000 नोटाबंदी: भारतात पुन्हा 1000 रुपयांची नोट चलनात येणार?

हेही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं

हेही वाचा >> आप्पासाहेब जाधव हकालपट्टीनंतर Eknath Shinde यांच्यासोबत जाणार?

‘हे’ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक मुख्यमंत्री आणि नेत्यांना निमंत्रण पाठवले असून त्यांना वैयक्तिकरित्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. खर्गे यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एनसी प्रमुख फारूक अब्दुल्ला यांना निमंत्रण पाठवले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, सीपीआय एमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

केसीआर यांची टीका

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर टीकास्त्र सोडले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, ‘अलीकडेच तुम्ही कर्नाटक निवडणुका पाहिल्या, भाजप सरकार हरले आणि काँग्रेस सरकार जिंकले. कोणी जिंकले, कोणी हरले. पण बदलणार काय? काही बदल होईल का? नाही, काहीही बदलणार नाही. गेली 75 वर्षे या कथेची पुनरावृत्ती होत राहिली, पण त्यात कोणताही बदल झालेला नाही.

ममता बॅनर्जी अनुपस्थित राहणार

कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभापासून अंतर राखून त्यांनी आपला प्रतिनिधी कार्यक्रमाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती देताना खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे खासदार काकोली घोष दस्तीदार बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वतीने कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!