By Poll: ‘शिवसैनिकांनो काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मतदान करा’, ठाकरेंचा थेट आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray Facebook Live: मुंबई: ‘शिवसैनिकांनो कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीलाच (NCP) मतदान करा. कारण भाजप (BJP) शिवसेनेला (Shiv Sena) संपवून त्यांची पाशवी पकड जर घट्ट करू पाहत असेल तर ती पकड आपल्याला ढिली करावीच लागेल.’ असं मोठं विधान शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या (Facebook Live) माध्यमातून महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांचा प्रचार केला. ज्यामध्ये त्यांनी भाजपला पराभूत करण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं आहे. (kasba and chinchwad bypoll shiv sainiks should vote for congress and ncp uddhav thackerays direct order)

पाहा फेसबुक लाइव्हमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:

‘बिनविरोध निवडणूक करताना लोकशाहीमधला मोकळेपणा शिल्लक राहिला आहे का? आजपर्यंत ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या कशा पद्धतीने झाल्या आणि आजची ही पोटनिवडणूक. दुर्दैवाने कसबा आणि चिंचवडची निवडणूक आली आहे. ज्यांना असं वाटतं की, ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती कारण ज्या आमदाराचं निधन झालं त्याच्याच बायकोला उमेदवारी दिली आहे. हे जर का सहानभूतीचं राजकारण पलीकडून होत असेल तर मग टिळकांच्या घरातील लोकांना दूर सारून दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली तिथे कुठे गेली सहानभूती? तिथे तर टिळकांचं घराणं वापरून सोडून दिलं.’

‘या सगळ्यात मला वाईट एका गोष्टीचं वाटलं. ते म्हणजे अगदी भाजपमध्ये असले तरीही गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. शिवसेनाप्रमुख जेव्हा-जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा-तेव्हा बापट हे चर्चेला यायचे. त्यांच्या प्रचाराच्या सभेला सुद्धा शिवसेनाप्रमुख गेले असतील.’

‘कसब्यात टिळकांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी न देता उमेदवार बदलून देण्यात आला आणि क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीश बापट गंभीर आजारी असताना.. म्हणजे मी त्यांचे फोटो पाहिले. ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घातलेल्या असतानाही त्यांना प्रचारात उतरविण्यात आलं. हा अमानुषपणा कोणता? अशा पद्धतीने लोकं वापरायची आणि फेकून द्यायची.. अशा पक्षाला आपण मतदान करायचं?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘नव्याने पक्ष बांधा अन्…’; गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज

‘मला काही जण म्हणतात की, कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत अपप्रचार केला गेला होता. की, शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करणार का?.. हो करणार… 25-30 वर्ष भाजपला नव्हतं केलं?’

‘मग ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्याशी तेव्हा वागले होते त्यापेक्षाही भयानक, निर्घृण पद्धतीने आज भाजप आमच्याशी वागत असेल तर मी तमाम शिवसैनिक आणि नागरिकांना सांगतोय की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कोणत्याही परिस्थितीत जे शिवसेनेला मुळासकट उखडायला निघालेत अशा भाजपला मदत होता कामा नये. ती जर मदत केली गेली तर आपण शिवसेनेचं नाव लावायचं नाही.’

ADVERTISEMENT

Shiv Sena: ‘ठाकरेंच्या आमदारांना व्हीप बजावता येणार नाही’, CM शिंदे काय म्हणाले?

ADVERTISEMENT

’30 वर्ष आपण जे राजकारण केलं.. पण महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर आपलं चिन्ह चोरलं.. नाव चोरलं आपल्यात फूट पाडली.. शिवसेना संपवायला निघाले. ही लोकशाही मानायला तयार नाही.’

‘मी जगताप वहिनींना हीच विनंती करतोय की, तुमच्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबीयांबद्दल आदर आणि प्रेम शिवसैनिकांच्या मनात आहे आणि राहील. पण सहानुभूती मात्र आता भाजपला दाखवण्याची परिस्थिती राहिली नाही. तुमचा वापर करून भाजप आपली पाशवी पकड जर घट्ट करू पाहत असेल तर ती पकड ढिली करावीच लागेल. नाईलाज म्हणून ही निवडणूक जिंकावी लागेल.’

‘आम्ही जे काही करतो.. त्याची लगेच बोंब मारली जाते. मुंबई महापालिकेच्या गैरकारभाराची चौकशी.. करा.. पण हिंमत असेल तर गेल्या पाच वर्षात पिंपरी-चिंचवड येथे जो काही सगळा घोटाळा झालाय आहे. तिथल्या स्थायी समिती अध्यक्षाला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं हे विसरू नका. हेची सुद्धा चौकशी लावा.’

‘आमच्याबद्दल तुमच्या मनात सहानुभूती नसेल तर तुमच्याबद्दलही आमच्या मनात सहानुभूती नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला गृहीत धरून जे काही राजकारण केलं जातं.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT