Mumbai Tak /बातम्या / Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?
बातम्या राजकीय आखाडा व्हिडीओ

Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?

Kasba Peth By Poll :

पुणे : कुठल्याही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर आपल्या उमेदवारांची संपत्ती नेमकी किती यावर सगळ्यांचं लक्ष असतं. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत उमेदवारांच्या संपूर्ण संपत्तीचा उलगडा होतोच. कसबा निवडणुकीसाठी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपच्या हेमंत रासने यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांचीही संपत्ती पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Congress’ Ravindra Dhangekar and BJP’s Hemant Rasane have filed applications for Kasba elections.)

रवींद्र धंगेकर यांची संपत्ती किती?

रवींद्र धंगेकरांची एकूण संपत्ती 8 कोटी 36 लाख 10 हजार 456 रुपये आहे. धंगेकरांकडे रोख रक्कम आणि बँकेतील ठेवी मिळून 47 लाख 6 हजार 128 एवढी रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्या नावे 68 लाख 67हजार 376 एवढी रक्कम आहे. धंगेकरांकडे 10 तोळे तर त्यांच्या पत्नीकडे तब्बल 15 तोळे सोनं आहे.

धंगेकरांच्या स्थावर संपत्तीचा विचार केला तर शेतजमीन, फ्लॅट आणि वारसाहक्कानं आलेली जमीन मिळून त्यांच्या नावे एकूण 4 कोटी 59 लाख 63 हजारांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 2 कोटी 60 लाख 72 हजारांची स्थावर संपत्ती आहे. रवींद्र धंगेकरांच्या नावावर 35 लाख 73 हजार तर पत्नीच्या नावे 32 लाख 8 हजार रुपयांचं कर्ज आहे.

रवींद्र धंगेकरांचं फक्त आठवीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. त्यामुळे, जर धंगेकरांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली तर आठवी पास आमदार असा शिक्का त्यांच्या नावावर बसेल.

हेमंत रासनेंची किती आहे संपत्ती?

शपथपत्रात दिलेल्या महितीनुसार हेमंत रासनेंची एकूण संपत्ती ही 17 कोटी रुपये एवढी आहे. रासनेंचं 2022-23 या वर्षाचं उत्पन्न हे पाच लाख 75 हजार चारशे दहा रुपये आहे. तर त्यांच्या पत्नी मृणाली रासनेंचं वार्षिक उत्पन्न चार लाख 30 हजार 830 रुपये असुन त्यांचा मुलगा निधेय रासनेचं वार्षिक उत्पन्न 3 लाख 17 हजार 430 रुपये आहे.

हेमंत रासनेंची जंगम मालमत्ता :

रासनेंकडे असणारी जंगम मालमत्ता एक कोटी 82 लाख 81 हजार 362 तर त्यांच्या पत्नींच्या नावावर 27 लाख 59 हजार 357 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रासनेंच्या मुलीच्या नावावर 8 हजार 423 तर  मुलाच्या नावे 2 लाख 77 हजार 578 रुपयांची जंगम मालमत्ता.

हेमंत रासनेंची स्थावर मालमत्ता :

हेमंत रासनेंच्या नावावर 2 कोटी 67 लाख 59 हजार 92 रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 81 लाख 14 हजार 495 रुपयांची आहे. मुलीच्या नावे 43 लाख 25 हजार तर मुलाच्या नावे 1 कोटी 33 लाख 59 हजार 533 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

यासोबतच हेमंत रासनेंच्या नावे 3 कोटी 55 लाख 63 हजार 414 रुपयांचं कर्ज तर त्यांच्या पत्नींच्या नावे 24 लाख 93 हजार 263 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर तुम्हाला का वाटतं एवढी मालमत्ता असणारे हेमंत रासने रवींद्र धंगेकरचा पराभव करतात की धंगेकर रासनेंचा पराभव करतात हे आम्हाला कंमेट करुन नक्की कळवा त्यासोबतच

---------
मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?