'असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही'; सोमय्यांनी काढल्या अनिल परबांच्या पावत्या

Kirit Somaiya allegations against Anil Parab : सोमय्यांनी अनिल परबांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावले टोले
'असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही'; सोमय्यांनी काढल्या अनिल परबांच्या पावत्या

ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब यांनी त्या रिसॉर्टशी आपला संबंध नसल्याचा दावा केला. परबांच्या दाव्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला. मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत सोमय्यांनी परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.

नीलम नगर येथील निवास्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना उलट सवाल केले.

सोमय्या म्हणाले, 'अनिल परब यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला त्या नाटकाची आठवण झाली आणि त्या नाटकाचं नाव आहे तो मी नव्हेच. तो मी नव्हेच मधील भूमिकेबद्दल माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. परत ते नाटक करायचं झालं, तर त्या भूमिकेसाठी अनिल परबांना पसंती असेल.'

'असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही'; सोमय्यांनी काढल्या अनिल परबांच्या पावत्या
सुरू न झालेल्या रिसॉर्टचं सांडपाणी समुद्रात जातंय म्हणून ईडीचे छापे -अनिल परब
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, 'माणूस एव्हढा नाटकी बनू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब म्हणतात तो मी नव्हेच. त्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. १२ मुद्दे मी काढले आहेत. त्याची उत्तर अनिल परब का देत नाहीत. अनिल परब म्हणतात, ते कशासाठी आले होते मला माहिती नाही.'

'माझा त्या रिसॉर्टशी काही संबंध नाही. तो रिसॉर्ट सदानंद कदमचा आहे. अनिल परब साहेब, माझ्याकडे १७ डिसेंबर २०२० ची एक पावती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अनिल परब पर्यावरण मंत्री. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री. त्याच रत्नागिरीतील दापोलीत असलेल्या मुरूड गावात ग्रामपंचायतीची पावती आहे,' असं सोमय्यांनी सांगितलं.

'अनिल परब यांनी २०२०-२१ मध्ये रिसॉर्टचा मालमत्ता कर भरला. त्याची पावती आहे. तो मी नव्हेच, नाट्यकार अनिल परबांनी यांचं उत्तर द्यावं. दुसरी पावती आहे, ती नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मधील. २०१९-२० मध्येही या रिसॉर्टचा मालमत्ता कर, दिवाबत्ती कर अनिल परब यांनी भरला आहे. हा रिसॉर्ट सदानंद परबचा आहे, तर अनिल परब घरपट्टी तुम्ही का भरत होतात?,' असा सवाल सोमय्यांनी केला.
'असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही'; सोमय्यांनी काढल्या अनिल परबांच्या पावत्या
अनिल परब दापोलीतील एका रिसॉर्टमुळे ईडीच्या जाळ्यात कसे अडकत गेले?

'२०१९-२० मध्ये मालमत्ता कर अनिल परबांनी भरला आहे. १६,६८३ चौरसफूट बांधकाम. हे रिसॉर्ट कुणाचं? घर क्र. १०६२ कुणाच्या नावाने अनिल परब यांच्या नावाने. आणि नाट्यकार अनिल परब सांगतात, त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही.'

'असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही'; सोमय्यांनी काढल्या अनिल परबांच्या पावत्या
अनिल परबांवर ED ची कारवाई, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..

'फसवणूक, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना नोबेल पुरस्कार मिळेल. उद्धव ठाकरेंनी बंगल्याबद्दल नाटकं केलं. अनिल परबांनी महावितरणला अर्ज केलाय. मुख्यमंत्री अनिल परबांचा फोटो ओळखतात की नाही. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब सांगतात की, माध्यमांना फसवलं, गंडवलं,' असं म्हणत सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि परबांवर हल्ला चढवला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in