''संजय राऊत साहेब हिसाब तो देना पडेगा''; सोमय्यांचा संजय राऊतांना टोला

भाजप नेते किरीट सोमय्या मागच्या अनेक काळापासून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत.
Kirit Somaiya | Sanjay Raut
Kirit Somaiya | Sanjay RautMumbai Tak

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या मागच्या अनेक काळापासून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. ठाकरे सरकारची 'डर्टी डझन' लिस्ट सोमय्यांनी माध्यमांसमोर आणली होती. दरम्यानच्या काळात किरीट सोमय्यांवरती हल्ले देखील झाले. आता महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुरु असताना किरीट सोमय्या शांत का आहेत? असा प्रश्न विचारले जात आहेत.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भाजपची साथ असल्याची टिका राज्यातील सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या शांत आहे अशीही टिका संजय राऊत (Sanjay Raut) करत आहेत. किरीट सोमय्या यांनी जारी केलेल्या डर्टी डझनमध्ये आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांचेही नाव होते. आता कुठेतरी शांत असलेली किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झाले आहेत.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की ''संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझा पत्नी ला, माझा मुलगा नील ला, आई ला.....जेल मध्ये टाकायचे प्रयत्न करा....धमक्या द्या, हल्ले करा शिव्या द्या....परंतु "हिसाब तो देना पडेगा". किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना निशाणा बनवले आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे गट आणि राज्य सरकारचा हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुवाहटीमध्ये असलेल्या मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत.

सरकारने काय म्हटलंय?

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल अशी तरतूद आहे, त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in