'दिल्लीश्‍वरांनी फडणवीसांचा काटा काढला', काँग्रेस प्रवक्त्यांचं खळबळजनक वक्तव्य

महाराष्ट्रामध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु होते. एकनाथ शिंदे मागच्या आठ दिवसांपासून आपल्या बंडखोर आमदारांसोबत राज्याबाहेर होते.
Eknath Shinde | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Devendra FadnavisMumbai Tak

मुंबई: महाराष्ट्रामध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु होते. एकनाथ शिंदे मागच्या आठ दिवसांपासून आपल्या बंडखोर आमदारांसोबत राज्याबाहेर होते. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. त्यांनतर पत्रकार परिषद घेवून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची घोषणा केली आहे.

हे राजकीय नाट्य इथे संपले असे वाटले होते परंतु अजून रंगले. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की मी सरकारमध्ये राहणार नाही. परंतु त्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन सांगितले की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावर आता विरोधी पक्षातून टिका होत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, मुक्काम पोस्ट 'ठाणे'!, असा आहे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवून देवेंद्र फडणवीसांनी मोठं मन दाखवलं, असा संदेश ते देऊ पाहात आहेत. परंतु फडणवीसांनी शिवसेनेचा काटा काढला, असे नव्हे, तर फडणवीसांचाच दिल्लीश्‍वरांनी काटा काढला, असे मोठे वक्तव्य कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले आहे.

भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतलं जाते. देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता पाहता त्यांना पदावरुन खाली खेचलं जात आहे. याची पुरेपुरे तयारी दिल्लीतील नेत्यांनी केली आहे असे लोंढे म्हणाले आहेत. शिवसेनेचे चिन्ह घेवून आणि एकनाथ शिंदेंना सोबत घेवून शिवसेना संपवण्याचा फडणवीसांचा डाव होता, असे लोंढे म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in