Trust Vote Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येक आरोपाला दिलं प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने (भाजप-शिंदे गट) विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओवर क्लिक करा

शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही -ममता बॅनर्जी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांव्यतिरिक्त अजून ‘काहीतरी’ दिले- ममता बॅनर्जी

‘मी पुन्हा येईन या वाक्यावरून मला किती सुनावलं गेलं, किती टिंगल केली गेली. मात्र आज मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही एकनाथ शिंदेंना घेऊन आलो,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis : “मी पुन्हा आलो आणि एकटा नाही आलो… एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन आलो”

ADVERTISEMENT

अनेक वर्षे मी देवेंद्र फडणवीस यांना भाषण करताना तुम्हाला पाहिलं मात्र पूर्वीचा जोश नव्हता. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून केलेलं भाषण मी पाहिलं आहे. तसंच विरोधी पक्ष नेते म्हणूनही तुमचं भाषण मी पाहिलं आहे. मात्र आज तो उत्साह नव्हता. या विधानभवनात जे निवडून आलेले आमदार आहेत त्यात सर्वात नशीबवान देवेंद्र फडणवीस आहेत कारण ते अडीच वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री पण झाले, विरोधी पक्षनेतेही झाले आणि उपमुख्यमंत्रीही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी अडीच वर्षात भुषवली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी खालील बातमीवर क्लिक करा…

Ajit Pawar : एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत याची सारखी आठवण का करून द्यावे लागते आहे?

विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणांची मुसळ’धार’

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणाची मुसळधारच बघायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांपासून ते गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत सर्वच सदस्यांनी एकमेकांवर शाब्दिक पलटवार केले. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांवर सदस्यांनी टीकास्त्र डागलं.

भास्कर जाधव यांचं भाषण सुरू

अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर तुफान फटकेबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ

विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर अजित पवारांनी सभागृह गाजवलं. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावेळी अजित पवारांनी पुन्हा एकदा फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना टोले लगावले. अजित पवारांच्या भाषणावेळी सभागृहात एकच हास्यकल्लोळ बघायला मिळाला.

काँग्रेसचे हे आमदार होते अनुपस्थित

अशोक चव्हाण

प्रणिती शिंदे

जितेश अंतापुरकर

विजय वडेट्टीवार

झिशांत सिद्दीकी

धिरज देशमुख

कुणाल पाटील

राजू आवळे

मोहन हंबर्डे

शिरीष चौधरी

शिंदे जिंकले, पण प्रश्न कायम

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने (भाजप-शिंदे गट) विश्वासदर्शक ठराव आज जिंकला. मात्र, शिवसेनेतील संघर्षामुळे निर्माण झालेले प्रश्न मात्र कायम आहेत. कारण आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावानंतर शिवसेनेच्या व्हीपचा मुद्दा प्रश्न सुनील प्रभू उपस्थित केला. त्यामुळे आता व्हीपचा प्रश्न निकाली लागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे.

विश्वासदर्शक ठरावाच्या परीक्षेत शिंदे सरकार ‘पास’

आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला एकनाथ शिंदे सरकार सामोरं गेलं. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मतं पडली. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केल्याची घोषणा केला.

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सभागृहाबाहेरच अडकले. मतमोजणीसाठी सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने या आमदारांना सभागृहात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही.

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, भास्कर आव्हाड, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, अजय चौधरी, रवींद्र वायकर नितीन तळे, वैभव नाईक, राहुल पाटील, कैलास पाटील, संजय पोतनीस यांचं ठरावाच्या विरोधात मतं

मतविभागणीची मागणी कधी केली जाते?

होयचे बहुमत असं पुकारल्यानंतर लगेच करावी लागते. त्याक्षणी मागणी करण्यात आल्यानंतर सर्वसाधारणपणे अशा प्रस्तावावर मान्य करण्यात येते.

हेड काऊंटिंग हीच तरतूद आहे का?

हात दाखवून मतदान करण्याची तरतूद नाही. नियमात हेड काऊंटिंगचीच (शिरगणती) तरतूद आहे आणि दुसरी तरतूद मतविभागणीची आहे.

विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नावे जाहीर

महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षांच्या नावांची आज विधानसभेत घोषणा केली. सदस्य आशिष शेलार, योगेश सागर, चेतन तुपे, संग्राम थोपटे, संजय शिरसाट यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना झटका! गटनेतेपदी कायम, सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द

शिरगणतीने मतमोजणी सुरू; सरनाईक देणार उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जात असून, सभागृहात शिगणतीने (प्रत्येक आमदार जागेवर उभं राहून क्रमांक मोजणी) मतमोजणी सुरू आहे. संतोष बांगर आणि प्रताप सरनाईक हे मतमोजणीवेळी उभे राहिल्यानंतर विरोधी बाकावरून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आपण उत्तर देऊ असं प्रतापसरनाईक म्हणाले.

शिवसेना जिल्हाध्यक्षांची बैठक

बंडखोरीपासून शिवसेनेत बैठकांचा धडाका सुरू असून, आज पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे.

…तेव्हा राजभवन परिसरातील पेढ्यांची दुकाने बंद पडली असावीत; ‘सामना’तून राज्यपालांना चिमटे

विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेला धक्का! आणखी एका आमदार शिंदे गटात

विश्वासदर्शक ठरावाच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांना झटका बसला आहे. शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना परत येण्याची विनवणी करणारे आमदार संतोष बांगरचं आता शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.

राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जात असून, या ठरावानंतर शिवसेनेतील अधिकारांची लढाई आणखी शिगेला जाण्याचीच चिन्हं आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT