'अनिल परब हाजिर हो'! मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचं समन्स, आज चौकशी

महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना त्यांच्या दापोलीतील रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे.
'अनिल परब हाजिर हो'! मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचं समन्स, आज चौकशी
maharashtra minister and shivsena leader anil parab has been summoned by ed dapoli resort money laundering case

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावलं आहे. अनिल परब यांना आज (१४ जून) चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा हजर होण्यास सांगण्यात आलं आहे.

ईडीने दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात मनी लाँड्रिंगची केस दाखल केली असून याचबाबत चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. यावेळी अनिल परब यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

अनिल परब यांचे जे निकटवर्तीय आहेत म्हणजेच सदानंद कदम, संजय कदम यांच्याशिवाय अन्य लोकांचे जबाब ईडीने आधीच नोंदवून घेतले आहेत. त्याशिवाय आयकर खात्याने जेव्हा छापेमारी केली होती तेव्हा त्यांना आढळून आलं होतं की, दापोलीला जो रिसॉर्ट आहे जो अनिल परब यांनी बांधला होता त्यामध्ये 6 कोटींची रक्कम वापरण्यात आली होती.

हेच सहा कोटी कुठून आले याचा काहीही हिशोब किंवा नोंद कुठेही नव्हती आणि इथूनच ईडीचा ससेमिरा अनिल परब यांच्यामागे लागला.

याशिवाय अनिल परब, सदानंद कदम आणि संजय कदम यांच्या घरी तसेच पुणे, दापोली सर्व ठिकाणी 26 मे रोजी ईडीच्या वेगवेगळ्या टीमकडून छापेमारी करण्यात आली होती.

maharashtra minister and shivsena leader anil parab has been summoned by ed dapoli resort money laundering case
सुरू न झालेल्या रिसॉर्टचं सांडपाणी समुद्रात जातंय म्हणून ईडीचे छापे -अनिल परब

एका रिसॉर्टमुळे कसे अडकत गेले अनिल परब?

  • अनिल परब यांचं रिसॉर्ट ईडीच्या रडारवर आहे.

  • याच रिसोर्टच्या आधारे ईडीने छापेमारी केली आहे, तसंच चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

  • याआधी ८ मार्चला आयकर विभागाने मुंबईतल्या एका केबल ऑपरेटवरवर तसंच वाहतूक विभागातील एक कर्मचारी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांवर शोध मोहीम राबवली होती

  • मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरी अशा २६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

  • या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना दापोली येथील जमीनाचा काही भाग २०१७ मध्ये अनिल परब यांनी १ कोटी रूपयांना खरेदी केल्याचं आढळून आलं. या मालमत्तेची नोंदणी २०१९ मध्ये झाली होती असंही समोर आलं.

  • सदर जमीन नंतर 2020 मध्ये शोध कारवाईमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाला 1.10 कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकली गेली.

  • सदरची जमीन तीच आहे ज्यावर २०१७ ते २०२० या कालावधीत रिसॉर्ट बांधण्यात आलं. अनिल परब यांच्याववर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टच्या बांधकामाचा मोठा भाग बांधून पूर्ण झाला होता. नंतर २०२० मध्ये जेव्हा ही प्रॉपर्टी विकण्यात आली तेव्हा रिसॉर्टचं काम पूर्ण झालं होतं. त्यामुळे हे रिसॉर्टच अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईचं मूळ ठरलं.

  • सर्वात महत्त्वाची बाब ही की रिसॉर्टच्या बांधकामाची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळेच या रिसॉर्टची चर्चा झाली आणि त्यावरून कारवाई सुरू झाली.

  • आयकर विभाग शोध घेत असताना आढळलेल्या पुराव्यांवरून हे दिसून आलं की रिसॉर्टचं बांधकाम २०१७ मध्ये सुरू झालं आणि या रिसॉर्टच्या बांधकामासाठी ६ कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला. त्या बांधकामाचा खर्च अनिल परब यांच्या हिशोबाच्या खात्यात नाही. त्यामुळेच रिसॉर्टवरून अनिल परब अडचणीत आले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in