Aaditya Thackeray : मुंबईतील नालेसफाईच्या आडून बंडखोर आमदारांवर 'बाण', म्हणाले...

शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या गटावर आदित्य ठाकरेंची टीका
aditya thackeray criticized rebel MLAs
aditya thackeray criticized rebel MLAs

वरळी, नायगाव आणि बीडीडी बाबत महत्त्वाचा निर्णय पोलिसांच्या कुटुंबियांसाठी घेतला हे सांगत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची तुलना मुंबईतल्या नालेसफाईशी केली आहे. मी महाराष्ट्रात जिथे जातो तिथे शिवसैनिक ही परिस्थिती संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहात आहेत. घाण निघून गेली आता चांगलं काही घडवू. पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका नालेसफाई करते. ही नालेसफाई झाली आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. २१ जूनला महाराष्ट्रात जो काही राजकीय भूकंप झाला त्याचे हादरे अजूनही बसत आहेत. ही लढाई आता सुप्रीम कोर्टात गेली आहे. ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असा हा सामना रंगला आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत असताना आम्ही पाठिंबा काढला आहे असं जाहीर केलं आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आलं आहे.

अशात आता महाराष्ट्राचं हे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आदित्य ठाकरे यांनी बंड पुकारलेल्या आमदारांवर टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे सातत्याने पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत आहेत. भेटीगाठी घेत आहेत आणि बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसत आहेत.

आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, २० जूनला जेव्हा त्यांनी बंड केलं तेव्हा काही फुटीरवादी आमदार पळवले आणि काही जण फसले. अजून १५-२० लोक आमच्या संपर्कात आहेत. मलाही फोन करतात. आपल्या शिवसैनिकांना फोन करत आहेत की, कसं ही करून येथून आम्हाला घेऊन जा. पण गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची कैदी असल्यागत परिस्थिती झाली आहे. यावर बोलताना ठाण्यापासून सुरुवात करायची झाली, तर बंड करायचा होतं... हिम्मत इतकी होती, जे स्वतःला आम्ही मोठे नेते आहोत असं समजत होते. त्यांना असं वाटतं ते दादागिरी करू शकतात, ते काही करू शकतात. दादागिरी तुम्ही सामान्य माणसावर कराल, पण दादागिरीने तुम्ही मन नाही जिंकू शकत. लोकांना जिंकू शकत नाहीत.

एकीकडे आदित्य ठाकरे ही टीका करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा कारण त्यांचं सरकार अल्पमतात आहे अशी मागणी केली आहे. सत्तेच्या सारीपाटावर आता पुढचा डाव काय असणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in