Eknath Shinde : "मी उद्धव ठाकरेंना सांगितलं की, तुम्ही चर्चेसाठी माणसं पाठवता आणि..."

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं बंड, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे न्यायचं असल्याचं ट्विट,
Eknath Shinde : "मी उद्धव ठाकरेंना सांगितलं की, तुम्ही चर्चेसाठी माणसं पाठवता आणि..."
Shiv Sena leader Eknath Shinde rebelled against the party

गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्राचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्याभोवती फिरतंय. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदेंनी बंडांचा ध्वज फडकावला. त्यामुळे राज्यातील सरकारचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय. त्यातचं शिवसेना आमदारांना मारहाण केल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आलीये. या सगळ्या प्रकारावर आता एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली.

कालपासून सुरु असलेल्या प्रकारावर एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. यामध्ये मला टीका करायची नाही. ती माझी सवय नाही. मला ते आवडत नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे काही आमदार एकत्र आलेले आहेत. आम्ही आतापर्यंत कोणताही निर्णय किंवा कुणाच्याही विरोधात भाष्य केलेलं नाही."

Shiv Sena leader Eknath Shinde rebelled against the party
"माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार अन्..."; बंडखोरीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"विकासाचं राजकारण आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी कालही बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहे. उद्याही असेन. आमच्यासाठी बाळासाहेब आणि दिघेसाहेब दैवत आहेत. बाळासाहेबांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला विचार दिलेत. हिंदुत्वाचे विचार दिलेत. ते विचार आम्ही पुढे घेऊन जातोय," अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी मांडली.

"आमची सुरुवातीपासूनची भूमिका हिंदुत्वाची होती. मी आजही सांगतो की, सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी तडजोड आम्ही करणार नाही."
Shiv Sena leader Eknath Shinde rebelled against the party
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल झाले?

आमदारांचं अपहरण करण्यात आल्याचा आरोपही हाय व्होल्टेज ड्रामादरम्यान झाला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "माझ्यासोबत आमदार जोरजबरदस्तीने आलेले नाहीत. ते स्वेच्छेने आलेले आहेत. मी सविस्तर सांगणार नाही, पण ४० पेक्षा जास्त आमदार आज माझ्यासोबत आहे. त्याचा एक फोटो आणि व्हिडीओ माध्यमांमध्ये आलेला आहे."

मिलिंद नार्वेकरांसोबतच्या भेटीबद्दल काय म्हणाले?

"कुठलाही प्रस्ताव वा कुठलीही चर्चा त्याठिकाणी झाली नाही. कारण मिलिंद नार्वेकर यांना मी सांगितलं की, तुम्ही माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेला आहात. पण चर्चा करायला येत असताना मी कुठलंही पक्षविरोधी काम केलं नाही, कुठलाही निर्णय घेतला नाही. मग गटनेता बदलला. मला गटनेता पदावरून काढलं. माझे पुतळे जाळले जात आहे. बदनाम केलं जात आहे."

"मी उद्धव ठाकरेंनाही सांगितलं की, तुम्ही बोलणी करायला माणसं पाठवता आणि तिकडे अशी कार्यवाही होते. हे काय बरोबर नाही. यापूर्वी मी आमदारांच्या मनातील भावना मांडलेली आहे. त्यामुळे याबाबतीतील पुढचा निर्णय आमदारांशी चर्चा करून घेतला जाईल," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Shiv Sena leader Eknath Shinde rebelled against the party
भर पावसात ४ किमी पळत गुजरात बॉर्डर गाठून शिवसेना आमदाराने गाठली मुंबई-संजय राऊत
"काल जो गटनेता निवडला गेला, तो नियमबाह्य गटनेता आहे. कारण सर्व आमदारांची बैठक घेऊन बहुमताने गटनेता निवडण्याची पद्धत आहे. बहुमताचा आकडा आमच्यासोबत आहे. त्यामुळे ती गटनेते पदाची निवड वैध आहे की अवैध हा तांत्रिक मुद्दा होऊ शकतो."

आमदारांची बंडखोरी का?

"या आमदारांच्या मनात खदखद आहे. आमदारांच्या मनात रोष आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तो होता. त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. हे आमदार तीन-चार लाख लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. ते सद्सदविवेक बुद्धिनुसार निर्णय घेतात. त्यामुळे हे आमदार मतदारसंघातील कामं आणि हिंदुत्वाची विचारधारा यासारख्या कारणांमुळे आले आहेत. मी सविस्तर नाही सांगू शकत," असं एकनाथ शिंदे यांनी सोबतच्या आमदारांबद्दल सांगितलं.

"संजय राऊत आमचे नेते आहेत. त्यांना काही माहिती असेल. पण असा कोणताही प्रकार इथे झालेला नाही. ४० पेक्षा जास्त आमदार इथे आहेत. लोकशाहीमध्ये असा प्रकार होऊ शकत नाही," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in