"माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार अन्..."; बंडखोरीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला धक्का; शिंदे यांनी ४० आमदार सोबत असल्याचा केला दावा बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेणार असल्याचं ट्विट
"माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार अन्..."; बंडखोरीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. सुरतवरून गुवाहाटीला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 'मुंबई tak'शी बातचीत केली. यावेळी त्यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली.

४० आमदारांना सोबत घेऊन आधी सुरतला गेलेले एकनाथ शिंदे मध्यरात्री सुरत सोडलं आणि सकाळी गुवाहाटीला पोहोचले. गुवाहाटीला जात असताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak शी संवाद साधला. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

आपण शिवसेना सोडत आहात का? असा प्रश्न ४० आमदारांसह गुवाहाटीला निघालेल्या एकनाथ शिंदे यांना विचारला असता, त्यांनी फक्त नकारात्मक मान हलवली. त्यानंतर पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले,"मी शिवसेना सोडणार नाहीये. मी बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जात आहे."

"माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार अन्..."; बंडखोरीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
कधी काळी चालवायचे रिक्षा! कोण आहेत एकनाथ शिंदे, ज्यांच्यामुळे ठाकरेंचं सरकार आलंय संकटात?
"आम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार पुढे घेऊन जात आहोत."

"जय महाराष्ट्र, गर्व से कहो हम हिंदू है, हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही कधीही तडजोड करणार नाही. सत्तेसाठीही तडजोड करणार नाही. आम्ही शिवसेना सोडणार नाहीये," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार म्हणाले, "गर्व से कहो हम हिंदू है. आम्ही शिवसैनिक आहोत आणि एकनाथ शिंदे जे सांगतील ते आम्ही करू. आम्ही आनंदी आहोत."

"माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार अन्..."; बंडखोरीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकणारी सगळी खेळी एकनाथ शिंदेंनी रचली तरी कधी?

रात्रीतून पोहोचले गुवहाटीला

काल दिवसभर सुरतमधील ले मेरिडिअन हॉटेलमध्ये असलेले बंडखोर आमदारांनी मध्यरात्री सुरत सोडलं. विशेष बस आणि सुरक्षेत त्यांना सुरत विमानतळावर नेण्यात आलं. त्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास हे बंडखोर आमदार गुवहाटीत पोहोचले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुवहाटीत पोहोचल्यानंतर आमदारांची संख्या वाढल्याचा दावा केलाय. शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. शिवसेनेचे ४० आमदार आता इथे आहेत.

भाजप आमदार पोहोचले स्वागताला

एकनाथ शिंदे यांच्यासह गुवहाटीत पोहोचलेल्या शिवसेना आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे आमदार सुशांता बोरगोहेन विमानतळावर हजर होते. "मी त्यांना घेण्यासाठी आलोय. किती आमदार आले आहेत, मी मोजले नाही. मी वैयक्तिक मैत्रीमुळे आलोय," असं ते म्हणाले.

"माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार अन्..."; बंडखोरीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? एकनाथ शिंदेंचं बंड फसलं तर काय असेल चित्र?

बंड शमवण्याचं आव्हान

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर करण्यासाठी शिवसेनेसमोर एकनाथ शिंदे यांचं बंड शमविण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून, कोणत्या तोडग्यानंतर बंड शमणार की शिंदे सेनेला सोडचिठ्ठी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in