'अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही'; बंडखोर आमदारांना शिवसेनचा गर्भित इशारा

एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली; ठाकरे सरकार अस्थिर झाल्यानंतर शिवसेनेचं स्वपक्षीय आमदारांवर टीकास्त्र
'अंत काय होणार, हे कोणीच  सांगू शकत नाही'; बंडखोर आमदारांना शिवसेनचा गर्भित इशारा

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवत एकनाथ शिंदेंनी थेट मातोश्रीलाच आव्हान दिलंय. शिवसेनेतील ३० ते ४० आमदारांना स्वतःच्या गटात ओढत एकनाथ शिंदेंनी शिवसेनाला भगदाड पाडलं. त्यामुळे ठाकरे सरकारचं स्थैर्यचं धोक्यात आलं असून, हाती शिवबंधन असलेल्या निष्ठावंतांना गर्भित इशारा दिलाय.

शिवसेनेनं काय म्हटलंय?

- "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला व नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे?"

- "शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये. सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच-डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाडय़ा, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजप सरकारचीच कृपा नाही काय? आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते."

'अंत काय होणार, हे कोणीच  सांगू शकत नाही'; बंडखोर आमदारांना शिवसेनचा गर्भित इशारा
एकनाथ शिंदे यांचं बंड कुठल्या दिशेने जाणार? काय आहेत सात शक्यता?
"कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा धाक दाखवून, 'आता तुमची जागा तुरुंगात' असं बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचं यापुढं कसं होणार? हे सर्व आमदार कालपासून भाजपच्या गोटात शिरले आहेत व दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते."

- "नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले व त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते?"

- "नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले व आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत."

'अंत काय होणार, हे कोणीच  सांगू शकत नाही'; बंडखोर आमदारांना शिवसेनचा गर्भित इशारा
एकनाथ शिंदेंचं शरद पवारांपेक्षा मोठं बंड; महाराष्ट्रातील 'ही' मोठी बंड राज्याच्या कायम स्मरणात...
"शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे ‘वेगळा गट’ करून आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील."

- "आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले."

'अंत काय होणार, हे कोणीच  सांगू शकत नाही'; बंडखोर आमदारांना शिवसेनचा गर्भित इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार,राजीनाम्याचा प्रश्नच नाही; संजय राऊत यांचा दावा

- "शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!"

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in