Mumbai Tak /बातम्या / Maharashtra Crisis: “भाजपच्या 50 आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, तर…”
बातम्या राजकीय आखाडा

Maharashtra Crisis: “भाजपच्या 50 आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, तर…”

Maharashtra political crisis supreme court hearing : महाराष्ट्रातील सत्तांतरांमध्ये राज्यपालांनी दिलेले आदेश आणि घेतलेल्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद होताना दिसला. राज्यपालांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने फेरयुक्तिवाद करताना राज्यपालांच्या बहुमत चाचणी करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं.

‘आता आम्हाला सर्व माहिती लक्षात आली आहे’, त्यामुळे फेरयुक्तिवादाचे मुद्दे मांडा, असं कपिल सिब्बल यांचा फेरयुक्तिवाद सुरू करण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी सांगितलं.

त्यानंतर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. “कलम 180 (1) बघा. त्याचबरोबर कलम 2 . जर विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त असेल, तर उपाध्यक्ष त्याचं काम करतात. जर उपाध्यक्षांचं पदही रिक्त असेल, तर राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नियुक्ती करू शकतात.”

Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात उलथापालथ होणार? 10 मुद्दे

“दहाव्या परिशिष्टात म्हटलेलं आहे की, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात कार्यवाही सुरू असली, तरी त्यांना अपात्रतेची कारवाई करण्यापासून थांबवता येत नाही”, असं कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात म्हणाले.

supreme court hearing on maharashtra political Crisis : “34 आमदार या प्रकरणाचा मूळ गाभा”

सिब्बल म्हणाले, “या प्रकरणाचा मूळ गाभा हा 34 आमदार आहेत. 34 आमदार माझ्याकडे येतात आणि मी त्यांना मान्यता देतो आणि हे जर घटनात्मक प्रक्रियेनुसार असेल, तर ठिक आहे. सरकारीया आयोगाने नमूद केलेलं आहे की, राज्यपाल पक्षाशी बोलू शकतात, व्यक्तीशी नाही”, असा मुद्दा सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात मांडला.

“त्यांच्यामध्ये फक्त 8 मंत्री होते आणि राज्यपालांनी कसं ठरवलं की ते बहुमतात आहे. याचा अर्थ राज्यपालांनी चुकीचा अर्थ लावला आणि शिवसेनेचं बहुमत असल्याच्या त्यांच्या दाव्यावर राज्यपालांचं समाधान झालं. राज्यपाल बहुमत चाचणीचा आदेश देण्यापूर्वी बहुमत अल्पमत कसं ठरवतात?”, असा सवाल सिब्बल यांनी केला.

Maharashtra Political Crisis : “ठाकरेंनी राजीनामा देऊन राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला”

“विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यात राजकीय पक्ष महत्त्वाचा असतो. सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमदार राजकीय पक्षानुसार काम करतात. आणि मतभेद हे सभागृहाबाहेरचे आहेत”, असंही सिब्बल यावेळी म्हणाले.

भाजपच्या 50 आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, तर… सिब्बल काय म्हणाले?

याच मुद्द्यावर युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले,”जर भाजपच्या 50 आमदारांनी आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला, तर राज्यपाल बहुमत चाचणी करायला सांगतील का? समोरच्या बाजूने जो युक्तिवाद करण्यात आला तो घटनेच्या मूलतत्त्वांच्या विरोधात करण्यात आला आहे”, असा मुद्दा त्यांनी मांडला.

“जेव्हा आम्ही न्यायालयात प्रवेश करतो तेव्हा ती वेगळी चमक असते. आम्ही अशा अपेक्षेने येतो की न्यायालय हीच एकमेव आशा आहे. न्यायालय कोट्यवधी लोखांचं आशास्थान आहे आणि लोकशाही उद्ध्वस्त होऊ दिली जाऊ शकत नाही. सॉक्रेटिसला फाशी का देण्यात आली? कारण त्याची अथेनियन देवावर श्रद्धा नव्हती. तसंच काहीसं इथेही घडत आहे”, असं सिब्बल म्हणाले.

त्यावर सरन्यायाधीशांनी प्रश्न केला की, दहाव्या परिशिष्टातील तरतुदींकडे दुर्लक्ष करून राज्यपाल बहुमत चाचणी करायला सांगू शकतात का?

त्यावर कपिल सिब्बल म्हणाले, “10वे परिशिष्ट सोडा, राज्यपाल एका गटाच्या आधारावर बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाही. राजकीय पक्षासोबत आघाडीच्या आधारावरच बहुमत चाचणी करायला सांगू शकतात.”

---------
मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?