"अफझल खान, औरंगजेब, भोंगा यापेक्षा...." जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना टोला

वाचा सविस्तर काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?
Minister Jitendra awhad answer raj thackeray over aurangjeb remark about sharad pawar
Minister Jitendra awhad answer raj thackeray over aurangjeb remark about sharad pawar

अफझल खान, औरंगजेब, भोंगा यापेक्षाही महत्त्वाचं आहे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि बेरोजगार झालेले युवक या प्रश्नांवर बोलणं. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. ३०० ते ३५० वर्षे जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावू नका असंही जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे.

एवढंच नाही तर शरद पवार यांनी कधीही औरंगजेबाचा उल्लेख सुफी संत असा केला नाही. राज ठाकरेंच्या डोक्यात बाबासाहेब पुरंदरे यांनी भरलेला इतिहास आहे त्यामुळे ते असं काहीतरी बोलत आहेत असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

"तुमचं भोंग्यांचं राजकारण झालं, मला अभिमान आहे महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी ओळखले की हे फक्त दंगली घडविण्यासाठी करत आहेत ३ तारखेला काहीही झालं नाही. पण तुमच्या त्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या तमाम काकड आरत्या बंद झाल्या. रात्रीची किर्तनं प्रवचनं बंद झाली. तुम्ही मारायला गेले कोण? मेले कोण? याचा जरा विचार करा. मला अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या मातीचा की या मातीमध्ये जो धर्म आहे तो जागा झाला आणि तो यांच्या जाळ्यात फसला नाही. महाराष्ट्रात दंगली भडकल्या नाहीत."

आज पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी पावसात भिजवण्यावरून शरद पवारांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. सध्या निवडणुका नाहीत मग काय करायचं आहे पावसात भिजून? असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले की राज ठाकरे यांनी पहिली सभा गुढीपाडव्याच्या दिवशी घेतली तेव्हा काय ते छत्री घेऊन उभे होते का? त्यानंतर तीन सभा झाल्या त्या काय छत्री हातात घेऊन झाल्या का? पावसाचं वातावरण अजून तयार झालेलं नाही. राज ठाकरेंनी मुद्दे शोधताना चूक केली आहे असंही आव्हाड म्हणाले.

एवढंच नाही तर सभेला गर्दी होणार नाही हे माहित होतं त्यामुळे सभागृहात सभा घेण्याची पळवाट राज ठाकरेंनी काढली असेल असाही टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातले एक चांगले वक्ते असलेले नेते आहेत. त्यांची प्रकृती चांगली नाही असं कळलं त्यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करतो असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले राज ठाकरे शरद पवारांविषयी?

शरद पवारांना औरंगजेब जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार. औरंगजेब शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता. तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी आला होता. मग काय शिवाजी महाराज यांच्यामध्ये आले होते का? स्वतःच्या सोयीसाठी इतिहास बदलू नका असंही म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांनी टीका केली.

तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in