...आमचा फक्त जनहिताचा भोंगा! म्हणत कांद्याच्या घसरलेल्या दरांवरून मनसेचा पवारांना टोला

जाणून घ्या मनसेने केलेल्या ट्विटमध्ये शरद पवारांवर नेमकी काय टीका केली आहे?
...आमचा फक्त जनहिताचा भोंगा! म्हणत कांद्याच्या घसरलेल्या दरांवरून मनसेचा पवारांना टोला

MNS Vs NCP : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केला आहे. यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. अशात टीका करणाऱ्यांना मनसेने उत्तर दिलं नसतं तरच नवल. राष्ट्रवादी काँग्रेसने जी टीका केली आहे त्याबाबत एक पोस्ट ट्विट करत मनसेने थेट कांद्यांच्या घसरलेल्या दरांवरून शरद पवारांना टार्गेट केलं आहे.

मनसेने काय म्हटलं आहे त्यांच्या पोस्टमध्ये?

कांद्याला पाच पैशांचा भाव हा हॅशटॅग ट्रेंड करत मनसेने ट्विट केलं आहे. यामध्ये कांद्याच्या किंमतीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फोटमध्ये मनसेने एक बातमीही पोस्ट केली आहे. त्यानंतर मोठा मथळा देण्यात आला आहे की कुणी निंदा, कुणी वंदा आमचा फक्त जनहिताचा भोंगा! महाविकास आघाडीविरोधातला भोंगा पुण्यात लावूच.. त्याचा आवाज मुजोर सत्ताधाऱ्यांना भानाव आणेल. तोपर्यंत देशाच्या माजी कृषीमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो पाच पैशांचा भावच कसा मिळत राहिल याबाबत तुम्ही विचारविनिमय करत बसा. असा टोला लगावत हे खोचक ट्विट मनसेने केलं आहे.

या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसनेही उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी नवीन भोंगा कोणता बरं लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलू.. असं म्हणत राष्ट्रवादीने ट्विटला उत्तर दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याबाबत एक आता मोठी अपडेट समोर येत आहे. राज ठाकरे यांनी आपला नियोजित अयोध्या दौरा हा तूर्तास स्थगित केला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे मनसैनिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. तर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांनी केलेल्या मारहाणीबाबत त्यांच्या अपमानाबद्दल त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी करत ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे हा संपूर्ण दौरा बराच चर्चेत आला होता. पण असं असताना आता राज ठाकरे यांनी अचानक आपला हा दौरा स्थगित केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in