'मनसे नेते अभ्यासात कच्चे आहेत', पवारांच्या 'त्या' फोटोवरुन संजय राऊतांनी मनसेला सुनावलं!

'मनसे नेते अभ्यासात कच्चे आहेत', अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या फोटोवर केली आहे.
'मनसे नेते अभ्यासात कच्चे आहेत', पवारांच्या 'त्या' फोटोवरुन संजय राऊतांनी मनसेला सुनावलं!
mns leaders share a photo of sharad pawar and brijbhushan singh shivsena mp sanjay raut criticized to mns raj thackeray

मुंबई: मनसे नेते गजानन काळे, संदीप देशपांडे यांनी शरद पवार आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा एक जुना फोटो शेअर करुन आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ज्याला प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. मनसेचे नेते अभ्यासात कच्चे आहेत असं त्यांनी यावेळी सुनावलं आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

'बृजभूषण शरण यांना कोण ओळखत नाही? आम्ही ओळखतो त्यांना. आम्ही एकत्र बसतो खासदार आहेत. एकत्र जेवतो, एकत्र भेटतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं? अभ्यास करा.. अभ्यास करा.. पार्लामेंटचा अभ्यास करा.'

'एका सभागृहात तिथे लोकं बसतात. आजूबाजूला असतात. एकत्रित चहापान करतात. योगींच्या बरोबर देखील आम्ही चहापान करतो. म्हणून काय योगींना आम्ही रसद पुरवली? यांना अडविण्यासाठी. अभ्यासात कच्चे आहेत हे लोकं.' अशा बोचऱ्या शब्दात संजय राऊतांनी मनसेच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

मनसे नेत्यांचा दावा काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला होता. ज्यानंतर राज ठाकरेंनी हा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचबाबत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत असं म्हटलं होतं की, माझ्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली.

ज्यानंतर मनसे नेते गजानन काळे आणि संदीप देशपांडे यांनी शरद पवार-बृजभूषण सिंह यांचा एक जुना फोटो शेअर करुन शरद पवारांवर निशाणा साधला. या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत.

मनसे नेते गजानन काळे यांनी या फोटो ट्विट केला असून यावेळी कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, "ब्रिज" चे निर्माते ... सुज्ञास अधिक सांगणे न लगे ... (फोटो झूम करून पाहावा...) त्यामुळे राज ठाकरे यांनी जो आरोप केला होता की, महाराष्ट्रतून रसद पुरविली गेली त्याविषयी आता थेट शरद पवारांवर मनसेकडून आरोप केला जात आहे.

mns leaders share a photo of sharad pawar and brijbhushan singh shivsena mp sanjay raut criticized to mns raj thackeray
शरद पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो, मनसे म्हणते सुज्ञास अधिक सांगण न लगे!

पाहा नेमकं काय म्हणाले गजानन काळे

'आज फोटो समोर आल्याने या सगळ्या कथानकामागचा निर्माता कोण हे महाराष्ट्राला आणि देशाला समजलं आहे. महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा राजसाहेबांनी आरोप केलेला होता. त्यांच्या या वक्तव्याला फोटोतून पुष्टी मिळाल्यासारखं आहे. हा महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडतोय. अयोध्या दौरा हा कोणताही राजकीय दौरा नव्हता. दक्षिणेत एखाद्या नेत्यांला असा विरोध केला गेला असता तर सर्व राजकीय पक्ष आणि नेते एकत्र आले असते. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात हे दिसत नाही. मनसेच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात हा राजसाहेबांनी आरोप केलेला आहे. आजच्या फोटोतून हा आरोप सिद्ध होतो.' असं गजानन काळे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in