Mumbai Tak /बातम्या / ‘देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांना आत घाला म्हणजे…’, शिंदेंचा गौप्यस्फोट
बातम्या राजकीय आखाडा

‘देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांना आत घाला म्हणजे…’, शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde slams ajit pawar over law and order situation : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांवर झालेले हल्ले आणि देण्यात आलेल्या धमक्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याची तयारी झाली होती, असा गौप्यस्फोट केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “धमक्या, खोटनाटे आरोप, कारवाया… मी सांगू इच्छितो की, नवनीत राणा, रवी राणा, नारायण राणे… अरे जेवणावरून उठवलं तुम्ही त्यांना, ते काय पळून जाणार होते का? मंत्री होते ते. त्यांना तुम्ही एव्हढी तत्परता दाखवली”, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.

गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याची तयारी, शिंदे काय म्हणाले?

“कंगना रणौत, आणखी एक बिचारी मुलगी केतकी चितळे… तिला आत टाकलं. तिकडे गिरीश महाजनांना तर मोक्का लावायची तयारी होती, पूर्णपणे. त्याची कॅसेट आली. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना आत घाला. म्हणजे भाजप बरोबर बॅकफूटला जाईल”, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केला.

Maharashtra budget session live: शिंदेंनी काढला व्हिप, ठाकरेंच्या आमदारांनाही लागू

“हे सगळे उद्योग कोण करत होतं? हे मला माहिती आहे ना? त्यावेळी मी काय म्हणालो हे आता सांगत नाही. नंतर सांगतो. हे उद्योग तुम्ही केले ना! दोन-दोन मंत्री तुरूंगात गेले आणि तुम्ही त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही”, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

“आमच्याबद्दल लोकांमध्ये खूप मोठा द्वेष आहे. तीव्र नाराजी आहे. अरे ज्याठिकाणी आम्ही जातोय, तिथे हजारो लोक स्वागतासाठी येतात. त्यांचं प्रेम आम्हाला दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सव्वासात हजार ग्रामपंचायतींपैकी साडेचार हजार सरपंच भाजप आणि शिवसेनेचे निवडून आले. ते लोकांची नाराजी आहे म्हणून निवडून आले का? लोकांचं प्रेम आम्हाला मिळतंय म्हणून अजित पवारांना पोटदुखी होतेय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Narayan Rane म्हणाले पुण्यात येऊन बारा वाजवीन; अजितदादांनी 3 शब्दांत विषय संपवला

‘चहामध्ये सोन्याचं पाणी’, शिंदेंनी पवारांना दिलं प्रत्युत्तर

अजित पवारांनी वर्षा बंगल्यावरील चहापानाच्या खर्चावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “वर्षा गेले अडीच वर्ष बंद होतं. सहा-सात महिन्यांपासून सुरू आहे. लोक येतात. राज्यभरातून लोक येतात. आल्यानंतर त्यांना चहा पानी पण द्यायचं नाही का? आम्ही तिकडे बिर्याणी नाही देत. चहापानी तर देऊ शकतो ना? आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. अजित पवार चहापानाचं काढतात. 70 हजार कोटी रुपये तुम्ही पाण्यात घातले, तरीही जमीन सिंचनाखाली आली नाही. त्याचा हिशोब आम्ही कधी विचारला का? तोही द्यावा लागेल”, असा टोला शिंदेंनी अजित पवारांना लगावला.

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…