'मविआ'ला 12 अपक्ष आमदारांचं बळ, ट्रायडंटमध्ये नेमकं काय घडलं?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआने आपल्या सर्व आमदारांची ट्रायडंटमध्ये बैठक बोलावली होती... त्याला 11 अपक्ष आमदारही हजर होते.
'मविआ'ला 12 अपक्ष आमदारांचं बळ, ट्रायडंटमध्ये नेमकं काय घडलं?
mva mla meeting rajyasabha election maharashtra shiv sena trident hotel

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जोरदार राजकारणाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत आमदार फोडाफोडीचा धोका टाळण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये काल (6 जून) रात्रीपासून ठेवण्यात आले होते. मात्र मालाड मार्वे बीचवरील रिट्रीट हॉटेल ते विधानभवन हा प्रवास दीड ते दोन तासांचा आहे. त्यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.

सध्या अटीतटीच्या वातावरणात आमदारांची नाराजी परवडणारी नाही म्हणून शिवसेनेनं पुन्हा एकदा सर्व आमदारांना ट्रायडंट हॉटेललवरच मुक्कामी ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

मंगळवारी (७ जून) दुपारी शिवसेना आमदार आणि समर्थक आमदारांची वरात पुन्हा एकदा ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्यासाठी मालाडच्या रिट्रीट हॉटेल ट्रायडंटच्या दिशेने गेली. याच ट्रायडेंट हॉटेलमध्ये मविआच्या आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.

दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत ट्रायडंटमध्ये मविआ आमदारांची बैठक :

दरम्यान, ट्रायडंटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी मविआच्या सर्व आमदारांसोबत चर्चा केली. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं करावं त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते, या सगळ्या गोष्टी आमदारांना सांगण्यात आल्याचे समजते. याशिवाय या निवडणुकीत नेमकी रणनिती काय असणार हे ठरवलं गेलं आहे.

ही निवडणूक मविआसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण या निवडणुकीत जर काही दगाफटका झाला तर त्याचा काही अंशी परिणाम होऊ शकतो. तसं झाल्यास भाजप आक्रमकपणे ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करु शकतं. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मविआने आता अत्यंत सावधपणे पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आता सर्व आमदारांना एकाच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

mva mla meeting rajyasabha election maharashtra shiv sena trident hotel
Rajya sabha Election : एमआयएमला कोण देणार प्रस्ताव?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर

12 अपक्ष आमदार उपस्थित

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मविआच्या ट्रायडंटमधील बैठकीला 12 अपक्ष आमदार उपस्थित आहेत. जी मविआसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी मविआची सगळी भिस्त ही अपक्ष आमदारांवर असणार आहे. त्यामुळेच 12 अपक्ष आमदारांची हजेरी ही मविआसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

12 अपक्ष आमदार मविआसोबत
12 अपक्ष आमदार मविआसोबत

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in