'दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्रेक करण्याचा प्रयत्न', कोणाबद्दल बोलले नाना पटोले?

Nana Patole: भाजप दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्रेक करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी. असं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलं आहे.
'दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्रेक करण्याचा प्रयत्न', कोणाबद्दल बोलले नाना पटोले?

योगेश पांडे, नागपूर: 'महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही.' अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यावर दिली आहे.

जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करतील. असंही नाना पटोले हे यावेळी म्हणाले आहेत.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पाहा नाना पटोले काय म्हणाले:

'कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर...'

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे.'

'मा. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पिकरबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही. हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे.'

'राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी.' असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

'भाजपा राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे'

'भाजपा राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून उद्रेक करण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे. यातून महाराष्ट्राची बदनामी होत असून त्याचा परिणाम गुंतवणूक व रोजगार निर्मितीवर होत आहे.'

'महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. बाहेरच्या राज्यातून तलवारी व इतर शस्त्र आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने उघड झाला आहे. धार्मिक विवाद करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे परंतु प्रशासन सतर्क आहे असून शासन व प्रशासन दोघेही राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हाणून पाडतील.' असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

'राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला यात काही वावगं नाही'

'कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, कायद्याच्या राज्यात गुन्हा दाखल झाला यात वावगे काही नाही. या सभेच्या पहिले नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे नियमाचा भंग झाल्यानेच कारवाई सुरु आहे.'

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहे. कारण पुढे अनुचित प्रकार होऊ नये. म्हणून या नोटीस देण्यात आल्या आहेत. प्रशासन जागरुक असल्याने आज महाराष्ट्रमध्ये शांतता आहे. त्यामुळेच पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. पण दुसरीकडे राज्याची बदनामी केली जात आहे. ती थांबली पाहिजे.'

'दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्रेक करण्याचा प्रयत्न', कोणाबद्दल बोलले नाना पटोले?
राज ठाकरेंच्या भाषणातलं 'हेच ते' वक्तव्य ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा झाला दाखल

'महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. प्रक्षोभक भाषण करण्याची संस्कृती महाराष्ट्रची नाही. केंद्रात सरकार आल्यापासून व्यक्ती विरोध सुरू आहे. त्यामुळे अश्या पद्धतीने भाषण करून धर्मांध वाद निर्माण केला जात आहे.' अशी गंभीर टीका नाना पटोलेंनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in