
योगेश पांडे
राज्यात ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण पून्हा मिळवण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. परंतु अनेक ठिकाणी आडनावावरून जात गृहित धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी राज्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. या संदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आडनावावरुन जात गृहीत धरु नका अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा पुर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत.
ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरु आहे पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातीत आहेत. ही पद्धत योग्य नाही, या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: लक्ष घालावे असेही पत्रात म्हणाले आहेत.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण ग्राह्य धरले नाही. तेव्हापासून राज्यसरकारवरती भाजप आरोप केले आहे. राज्य सरकार न्यायालयात योग्य भूमिका मांडत नाही. ओबीसींचा डेटा गोळा करत नाही अशाही टीका विरोधी पक्ष करत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना राज्य सरकार डेटा गोळा करण्यात चुकत आहे, आरक्षण पुन्हा टिकणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.