''हिंदुत्व शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारू नये, माझा आक्षेप आहे''

''मुख्यमंत्र्यांना काल माईक मिळाल्यावर भान राहीलं नाही.''
''हिंदुत्व शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारू नये, माझा आक्षेप आहे''
cm uddhav thackeray (फाइल फोटो)

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यामध्ये त्यांनी भाजपवरती सडकून टीका केली आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणेंनी कालच्या सभेवरुन उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना काल माईक मिळाल्यावर भान राहीलं नाही. तिनपाट, मर्द असे वाह्यात शब्द आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आले नाहीत.

आतापर्यंत फक्त ठाकरे आणि मातोश्रीला काम मिळालं, किती लोकांना काम मिळालं हे मला माहीत नाही असे नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी काल शिवसेनेच्या हिंदुत्त्वाची व्याख्या सांगितली त्यावर नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. हिंदुत्व हा शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारू नये त्याला माझा आक्षेप आहे.

''अडीच वर्षात संभाजी नगर झालं नाही.''

अडीच वर्षात संभाजी नगर झालं नाही. आता म्हणतात आधी शहर सुधारू. मग मुंबईचं काय केलं? देशात कुठे नसेल एवढा भ्रष्टाचार या महानगर पालिकेत आहे अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. ज्या माणसाला 20 मिनिटे चालता येत नाही तो माणूस मर्दपणाच्या गोष्टी कशा करू शकतो? ज्याला अमृतमहोत्सव माहीत नाही तो माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो का? असे सवालही नारायण राणेंनी पत्रकार परिषदेदरम्यान विचारले.

काल उद्धव ठाकरे म्हणाले होते मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून माझी ओळख आहे. त्यावर नारायण राणे म्हणाले ''उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात, नुसतं उद्धव ठाकरे असता तर आला नसतात, नशीब हे कबूल तरी केलं.'' अनिल परब, सुभाष देसाईंचा मुलागा यांच्यावर लवकरच कारवाई होईल. सुभाष देसाईंचा मुलगा MIDC चा एजेंट आहे असेही राणे म्हणाले.

''उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला''

अडीच वर्षांच्या कार्यकिर्दीत मुख्यमंत्र्यांनी एकच काम केलं ते म्हणजे नारायण राणेंच्या घराला नोटीस देण्याचं. भाजपच्या नेत्यांवर बोलाल तर त्यापेक्षा तीव्र उत्तर मिळेल असा इशाराही राणेंनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in