आदित्य ठाकरे-उद्धव ठाकरेंना घेरण्याचा भाजपचा प्लान ठरला?; नारायण राणेंचं सूचक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा संघर्ष सध्या राज्याच्या राजकारणात दिसत आहे. दसरा मेळाव्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तीव्र झाल्याच्या दिसत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल मोठं विधान केलं आहे. आणि त्यामुळेच भाजप आता ठाकरे पितापुत्रांना घेरण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळताहेत.

नारायण राणे आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. आरोपांना उत्तर देताना राणेंनी ठाकरे पितापुत्रांना (आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे) तुरुंगात पाठवण्याबद्दल विधान केलंय.

आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले, “उत्तराखंडमध्ये एका मुलीची हत्या झाली, त्याबद्दल तो (उद्धव ठाकरे) भाषणात बोलला. आमचा एका नेत्याचं नाव घेऊन बोलला. अंकिता भंडारीच्या खुनाबद्दल दुःख व्यक्त केलं. दुःख व्यक्त केलं, ठिक आहे. पण, दिशा सालियनचाही खून झाला. तुम्ही मुख्यमंत्री असताना दिशा सालियनचा खून झाला. सुशांतसिंगचा खून झाला.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“दिशा सालियनवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर वरून खाली टाकण्यात आलं. का आरोपींना अटक झाली नाही. त्यात कोण कोण होते. कोण मंत्री होता. का वाचवलं त्याला. सचिन वाझेंना खात्यात आणून त्याला वाचवलं ना. लोक चर्चा करतात, आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहे. त्या अत्याचारामध्ये आहे. आतापर्यंत मी नाव घेत नव्हतो, पण चर्चा सर्वत्र सुरूये की आदित्य ठाकरे त्यात आहे आणि म्हणून लपवालपवी सुरूये”, असं राणे म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच राणेंनी या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलंय.

पुढे बोलताना राणे असंही म्हणाले की, “सचिन वाझेंनी ते मॅनेज केलंय. अशी पापं करायला मुख्यमंत्री झालास का? आता उत्तराखंडमधल्या मुलीबद्दल सांगतो. चुकीचं झालं असेल, तर कारवाई होईल. आम्ही लपवणार नाहीये. दिशा सालियनबद्दल, सुशांतबद्दल जे पापं केलंय, ते तुला कधीही विसरता येणार नाही. सरकार आता तुझं नाहीये. त्यामुळे त्यातले आरोपी पकडले जाणार. आतमध्ये जाणार. तुझी मस्ती उतरवणार”, असं विधान राणेंनी ठाकरेंना उत्तर देताना केलंय.

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना काय दिला इशारा?

नारायण राणे आदित्य ठाकरेंनाच तुरुंगात पाठवू असं म्हटलेले नाहीत, तर उद्धव ठाकरेंनाही तुरुंगात जावं लागेल असं ते म्हणालेत. “भुजबळ दोन-अडीच वर्ष तुरूंगामध्ये राहिले. जे काही व्यवहार झाले त्या प्रकरणात. भुजबळांचा जो चतुर्वेदी सीए आहे, त्याच सीएने मातोश्रीचे तेव्हढेच पैसे व्हाइट केलेले आहेत. भुजबळ ईडीमुळे आतमध्ये राहिले. आता उद्धव ठाकरेला पुढची अडीच वर्ष काढायची आहेत. सोडणार नाही, आम्ही. कारण तुम्ही लोकांचं शोषण करून हे पैसे मिळवले आहेत”, असं राणे म्हणालेत.

ADVERTISEMENT

आजच्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी पहिल्यांदाच सामनाचे संपादक असलेल्या उद्धव ठाकरेंवर आर्थिक व्यवहारावरून प्रश्न उपस्थित केलाय. त्याचबरोबर राणेंनी ठाकरेंचे पाटणकरांचंही नाव घेतलंय. या प्रकरणाचा उल्लेख करत ठाकरेंना हिशोब द्यावा लागेल, असं राणे म्हणालेत. महत्त्वाचं म्हणजे राणेंनी भुजबळांच्या ईडी प्रकरणाचाही उल्लेख केलाय. दुसरीकडे दिशा सालियन प्रकरणात थेट ठाकरेंचं नाव घेतलंय. दिशा सालियनवर अत्याचार करण्यात आले आणि त्यात त्यांचा सहभाग असल्याची चर्चा सुरूये असं म्हणत राणेंनी गंभीर आरोप केलेत. त्यामुळे ठाकरे पितापुत्रांना घेरण्याचा भाजपचा प्लान ठरल्याची चर्चा सुरू झालीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT