
नवाब मलिक हे मुसलमान असल्यानेच तुरुंगात आहेत, संजय राऊत यांच्यावर कारवाई का केली नाही? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी भिवंडी येथे झालेल्या सभेत केला आहे. आज महाविकास आघाडीला त्यांनी टार्गेट केलं. नवाब मलिक यांची अटक म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डाव आहे असाही आरोप ओवेसी यांनी केला.
ओ
काय म्हणाले ओवेसी?
महाराष्ट्र सरकारचा लोकशाहीत विश्वास असेल तर हे सरकार जेलमधल्या लोकांची सुटका करेल. जे नेते जेलमध्ये जातात त्यांची ताकद आणखी वाढते. खालीद गुड्डू हा सुटला की मोठा नेता होईल हे कुणी विसरू नये. नवाब मलिक यांनाही सरकारने सोडलं पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत जाऊन मोदींना भेटतात तेव्हा मीडियाने सांगितलं की पवार मोदींना म्हणाले की संजय राऊतांवर कारवाई करू नका, राऊतांना जेलमध्ये टाकू नका.
त्यांची चौकशी करू नका. मग मी विचारतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाना मलिक का नाही आठवले? संजय राऊत हे नवाब मलिक यांच्यापेक्षा जास्त प्रिय आहेत का? असाही सवाल ओवेसी यांनी भाषणात केला.
नवाब मलिक हे तुमच्याच पक्षाचे नेते आहेत, जेव्हा मोदींना भेटलात तेव्हा मलिकांचंही नाव घ्यायचं होतं. नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि संजय राऊतांना सोडून दिलं. यावरून संजय राऊत हे शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला अधिक प्रिय झाले आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. यावरून राजकारण पेटण्याची चिन्हं आहेत.
नवाब मलिक आणि संजय राऊत हे बरोबरीचेच नेते आहेत. मग नवाब मलिक जेलमध्ये जातात आणि संजय राऊत यांना सोडलं. मलिक सुटले की पुन्हा ते शरद पवारांकडेच जातील. त्यामुळेच त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. निवडणुका आल्या की मोदींना रोखायचं आहे असं म्हणतील, हे ढोंग करतील असं म्हणत ओवेसींनी शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल चढवला. नवाब मलिक यांना मुस्लिम म्हणूनच तुरुंगात टाकलं गेलं आहे असाही आरोप ओवेसींनी केला आहे.