Sharad Pawar : कार्यकर्ता अन् शरद पवारांचा भावनिक बंध; सोलापूर जिल्हा साक्षीदार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Sharad Pawar in Solapur for marriage ceremony)

मंगळवेढा : आपला कार्यकर्ता कसा जपायचा असतो याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेकदा परिपाठ घालून देत असतात. तसाच काहीसा पुन्हा एकदा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लतिफ तांबोळी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आला आहे. तांबोळी यांच्या आमंत्रणानंतर त्यांची मुलगी हिना हिच्या विवाह सोहळ्याला शरद पवार यांनी सपत्नीक हजेरी लावली. तर पवार येणार म्हणून तांबोळी यांनीही रुढी आणि परंपरांना छेद देत शनिवारी लग्न लावलं. (After the invitation of Latif Tamboli, Sharad Pawar attended the marriage ceremony of his daughter Hina in solapur district maravde village)

मुस्लीम समाजात शुक्रवारचा दिवस आणि सकाळी ११ चा मुहूर्त शुभ मानलो जातो. याच दिवशी आणि वेळी विवाह, मुंज असे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. परंतु तांबोळी यांनी पवार यांच्या वेळेनुसार मुस्लीम समाजातील रुढी परंपरांना छेद देत शनिवारी लग्नाचा मुहूर्त काढला आणि वेळ दुपारी तीनची ठेवली. पवार जेव्हा सपत्नीक लग्न‌ सोहळ्यासाठी हजर झाले तेव्हा तांबोळी यांना आनंद अश्रू अनावर झाले होते. “माझा देव आला, असं म्हणतं त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे चरणस्पर्श केले”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Solapur : लग्नाळूंच्या भावनांशी खेळ; शेकडो तरुणांची फसवणूक; रॅकेट उद्धवस्त

तांबोळी हे पहिल्यापासून शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुलगी हिना हिचा विवाह नक्की केला अन् शरद पवार यांना बोलविण्याचं नक्की केलं. त्यांचा कार्यक्रम आणि वेळ पाहुन शनिवारी लग्नाचा मुहूर्त काढला. तिच्या विवाहाची पत्रिका पवार यांना देऊन लग्नाला येण्याची विनंती केली. पवारांनीही होकार दिला. सुरुवातीला शुक्रवारचा मुहूर्त डावलून शनिवारची तारीख ठरविल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली.

ADVERTISEMENT

Solapur : अंडरपासमुळे झाला घात, 12 काळविटांचा मनाला चटका लावणारा अंत

ADVERTISEMENT

पण ठरलेल्या वेळी शरद पवार यांचं हेलिकॉप्टर मरवडे गावात उतरलं अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांसह तांबोळींचे नातेवाईकही आवाक् झाले. असं म्हणतात की, शरद पवार एखादा खूपच खास किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील तरच पत्नी प्रतिभा पवार यांना सोबत घेऊन येतात. मात्र मंगळवेढा तालुक्यातील एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहासाठी हेलिकॉप्टर घेऊन पवार सपत्नीक आल्यानं पक्षाचा कार्यकर्ता किती महत्वाचा असतो हे दाखवून दिलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT