महाराष्ट्र, सिंहासन अन् शरद पवार… 44 वर्षांपूर्वी काय-काय घडलं होतं?

ADVERTISEMENT

Jabbar Patel recounted many memories of Sharad Pawar's help during the shooting of the movie Sinshan
Jabbar Patel recounted many memories of Sharad Pawar's help during the shooting of the movie Sinshan
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे कलाप्रेम, चित्रपट, नाटक आणि अभिनेते यांच्याबद्दल असलेली आपुलकी या गोष्टी अनेकदा दिसून आल्या आहेत. याच गोष्टींची पुनरावृत्ती आज (मंगळवारी) मुंबईत पाहायला मिळाली. जब्बार पटेल (Jabbar Patel) दिग्दर्शीत सिंहासन चित्रपटाला ४४ वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईत दिग्गजांचे गप्पासत्र आयोजित करण्यात आले होते. या गप्पासत्राला स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे, नाना पाटेकर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र उपस्थित होते. यावेळी जब्बार पटेल यांनी १९७०-८० च्या दशकात शरद पवार यांनी चित्रपटासाठी कशी आणि काय-काय मदत केली या गोष्टींचा उलगडा केला. (Jabbar Patel recounted many memories of Sharad Pawar’s help during the shooting of the movie Sinshan.)

जब्बार पटेल यांनी काय सांगितलं?

चित्रपटाचे लोकेशन :

मला चित्रपटासाठी केवळ 4 लाख रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यावर मी लेखक विजय तेंडुलकर यांच्याशी चर्चा केली. एवढ्या पैशांमध्ये सगळ्या गोष्टी कशा बसवणार? असं त्यांना सांगितलं. तेंडुलकरही म्हणाले, हे सेट कुठे बांधायचे, मंत्र्यांचे बंगले कुठे उभे करायचे? त्यावर त्यांनीच मला सल्ला दिला, “तु शरदला जावून भेट”. मी शरद पवार यांना जावून भेटलो. मी त्यांना सांगितलं, “मी असा एक चित्रपट करत आहे. तुम्ही माझ्यासाठी काय करालं?”

सिंहासन: ‘पत्रकारांबाबत काय वाटतं?’, शरद पवार म्हणाले…

शरद पवार यांनी पटकथा घेतली आणि ती मुख्य सचिवांना दिली. मुख्य सचिवांनी चुकीच्या ठिकाणी आल्याचं सांगतं मदत होणार नसल्याचं स्पष्ट केलं. पवार यांनी पुन्हा मुख्य सचिवांशी चर्चा केली. पण मुख्य सचिवांनी नकार दिला आणि आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असल्याचं सांगितलं. शरद पवार यांनी मला विचारलं, तुम्ही उद्या मुंबईत आहात का? उद्या या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो तर त्यांनी मला एक खाकी लखोटा पुढे सरकवला. मला म्हणाले, उघडून पहा. मी बघितलं तर त्यात लिहिलं होतं, “तुम्हाला चित्रपटाच्या शुटींगसाठी परवानगी देत आहोत”. शुक्रवार दुपार, शनिवार आणि रविवार असे तिन्ही दिवस मला शुटींगची परवानगी मिळाली. तसंच शंकरराव चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांची प्रशस्त केबिनही मला दिली.

शरद पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी माझ्या बंगल्यांचाही प्रश्न सोडवला. आमदार हशू अडवाणी यांच्याशी आपण बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं. हशू अडवाणी यांच्याशी बोललो तर ते म्हणाले, मी गावी जात आहे, चावी ठेवली आहे, वापरा. सुशील कुमार शिंदे रॉयल स्टोनमध्ये राहायचे. ते म्हणाले, मी १५ दिवस परदेशी जात आहे, चावी ठेवतोय, तुम्हाला पाहिजे तसा वापरा. जुने सह्याद्री गेस्ट हाऊस उपलब्ध करुन दिले, त्यामुळे माझा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा प्रश्न सुटला,असं करतं पवार यांनी माझ्या चित्रपटाच्या लोकशेन्सचा प्रश्न सोडवला. सेट उभे करण्यासाठीचे पैसे वाचवले.

ADVERTISEMENT

जब्बार पटेल – यशवंतराव चव्हाण भेट

विधिमंडळाचा प्रश्न होता. पण जर विधिमंडळात शुटींग करायचे असले तर राष्ट्रपतींची परवानगी लागते. त्यामुळे ते शरद पवार यांच्या हातात नव्हते. पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या ऑडिटोरियमची रचना अगदी विधिमंडळासारखीच होती. तिथंच विधिमंडळाचं शुट करायचं ठरलं. त्यामुळे तो प्रश्न सुटला.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागताच चंद्रकांत पाटलांची कोलांटउडी, म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या…’

पण ज्यादिवशी माझ्या हातात शरद पवार यांनी परवानगीचा कागद दिला तेव्हा ते मला म्हणाले, जेवण करुन घ्या, आपल्याला जायचं आहे. मी विचारलं कुठे? तर मला म्हणाले, “जेवण तर करुन घ्या”. मी जेवलो आणि गाडीत बसलो. सांताक्रूझ विमानतळावर आलो. तिथं आलो तर समोर उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचं विमान.

यशवंतराव चव्हाण खाली उतरले. मला शरद पवार म्हणाले, चला भेटूया आपण. भेटलो, बोलणं झालं. मला पवारांनी गाडीत पुढे बसवले. गाडी बाहेर पडली आणि त्यांनी पवारांनी यशवंतरावांना सांगितलं. “जब्बार सिंहासनवर चित्रपट करत आहे”. सुरुवातीला त्यांना आवडलं नाही, पण मी त्यांना मुंबई दिनांक बद्दल सांगितल्यानंतर त्यांनी कौतुक केलं.

थोडं पुढे आल्यानंतर यशवंतराव चव्हाण मला म्हणाले, जब्बार एक गोष्ट वडिलकीच्या नात्याने सांगु? तुम्ही विधानसभेत पण शुटींग करणार असाल ना? मी हो म्हणालो. त्यावर ते पुढे म्हणाले, एक गोष्ट सांगू, रागावू नका. या देशाला फार मुश्किलीने स्वातंत्र्य मिळालं आहे. खूप गोष्टी घडल्या आहेत. त्यामधून बाबासाहेब आंबेडकर यांनी एक संविधान दिलं. मला मान्य आहे तिथं आमदार तुमच्या सारख्या बाहेरच्या लोकांना न पटणारी काम करत असतील. पण एक सांगतो, त्या सभागृहाला एक प्रतिष्ठा असते. ती प्रतिष्ठा म्हणजे लोकशाहीची. काहीही होवो, ही प्रतिष्ठा जपा.

मला एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळाली, देशाच्या उपपंतप्रधानांही ती गोष्ट समजली आणि त्यांनीही मला यात काही महत्वाचा गोष्टी सांगितल्या. पुढे यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत सिनेमा पहिल्यानंतर मला म्हणाले, तुम्ही मी सांगितलेली गोष्ट तंतोतंत पाळली. सामान्य माणसाला कदाचित वादग्रस्त वाटणारा चित्रपट होता. पण तुम्ही सभागृहाची प्रतिष्ठा जपली.

चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी शरद पवार :

चित्रपट तयार होत आला असतानाच जनता पक्षाच सरकार गेलं होतं. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान होणार असं वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे मला अनेकांनी सांगायला सुरुवात केली की इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर या चित्रपटाचं काय होणार? तो आधी सेन्सॉरला पाठवा. चित्रपट सेन्सॉर होवून आला. वकिलांनी सांगितलं जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत काही नाही. म्हणून आम्ही एका थिएटरमध्ये चित्रपट रिलीज केला. पुढे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाला थिएटर मिळत नव्हते. दादा कोंडके यांचे चित्रपट सुरु होते.

Babri Demolition: ‘मिंधे जे सत्तेसाठी चाटत बसले, त्यांनी…’, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य जिव्हारी, ठाकरे बरसले

मला त्यावेळी व्ही शांताराम मदतीला धावून आले. त्यांनी पुण्यातील एक थिएटर सुचवलं. पण मला ते थिएटर फारसं पसंत नव्हतं. ते खूप जुनाट झालं होतं. पण मी गेलो, त्यांनी चित्रपट लावला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला पेढे आणून दिले आणि म्हणाले, तुमचं एक आठवड्याचं अॅडव्हान्स बुकिंग झालं आहे. प्रिमिअरला शरद पवार येणार आहेत. पहिल्यांदा माझा विश्वासच बसत नव्हता. पण शरद पवार आले, आणि त्यानंतर पुढचे अनेक दिवस चित्रपट चालला. अशा प्रकारे चित्रपटासाठी प्रत्येक टप्प्यावर शरद पवार यांची मदत झाल्याचं जब्बार पटेल यांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT