राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला- सुप्रिया सुळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पुणे: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली आहे. त्यांनी शिंदे- फडणवीस यांच्या होम व्हिजिटवरतीही खोचक टोला लगावला आहे. हे इव्हेंडबाजी करत आहे. दौरेही एक किलोमीटरच्या आतले असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

शिंदे फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंटबाजी- सुप्रिया सुळे

शिंदे फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंटबाजी असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. “50 खोके ऑल ओके वाल्या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नव्हती. सध्या सरकारमधील लोक कार्यक्रमांना भेटी देणं सोडतील तर जनतेची सेवा करतील. हे एवढे सेलिब्रेशन करण्यात एवढे व्यस्त आहेत की बस्ता बांधला त्यानंतर लग्न केले. मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरु आहे.”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पुण्यात माध्यामांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा ५० खोके घेतल्याचं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या “राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात”. ज्या उत्साहानं आमचं सरकार पाडलं त्या उत्साहाने कामं होत नाहीत. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नेहमीच टीव्हीवरती दिसतात

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीसांच्या गाठीभेटीवरती सडकून टीका केली आहे. ”गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले आहेत. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्या तरी घरीच दिसतात.”

सुप्रिया सुळेंनी केलं आघाडी सरकारचं कौतुक

शिंदे-फडणवीसांचं सरकार काम करत नाही म्हणत सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडी सरकराचं कौतुक केलं आहे. “महाविकास आघाडी सरकारचे सगळे नेते सकाळी 7 वाजल्यापासून कामाला सुरुवात करत होते. तसेच दर शुक्रवारी मॅरेथॉन मिटिंग घ्यायचे. आताच्या मंत्रिमंडळात राज्याला पालकमंत्री नाहीत. कोव्हिड असो किंवा नसो अजित पवार सकाळी सहा वाजल्यपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. पालकमंत्रीच नाहीत त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT