नितीन गडकरींचा पुन्हा भाजपला घरचा आहेर, संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर पहिल्यांदाच बोलले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. आपल्या कामाच्या शैलीसाठी ओळखले जाणारे गडकरी एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून हटवण्यात आले. नितीन गडकरींसारख्या नेत्याला संसदीय मंडळात जागा न दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा होती. आता या प्रकरणावर नितीन गडकरी व्यक्त झाले आहेत. ”कोणाचा वापर करुन गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका” असे म्हणत नितीन गडकरींनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे.

नागपूरमध्ये उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण दिलं. ते म्हणाले, व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका. जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करा कारण समाजसेवा, राजकारण, व्यवसाय यामध्ये जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची ताकद आहे असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

नितीन गडकरींना डच्चू तर देवेंद्र फडणवीसांना दिली आहे संधी

दरम्यान भारतीय जनता पक्षाने मागच्या काळात त्यांच्या संसदीय समितीमध्ये मोठे फेरबदल केले. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय समितीत डच्चू देण्यात आला तर देवेंद्र फडणवीसांना संसदीय समितीमध्ये संधी देण्यात आली. गडकरींशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय समितीतून हटवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतूनही बाहेर फेकले गेले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना मंडळावरुन हटवण्यात आले तर बीएस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण यांचा संसदीय समितीत समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरींना काढून देवेंद्र फडणवीसांना संधी दिल्याबद्दल राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

नितीन गडकरींची वक्तव्य कायमंच असताता चर्चेत

मागे एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी सरकारलाच घेरले होते. “बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे आणि वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. पण, सरकारची सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे सरकार वेळेवर निर्णय घेत नाही.” असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं.

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात गडकरींनी राजकारण सोडण्याची भाषा केली होती. “आता आपण जे बघतोय ते शंभर टक्के सत्ताकारण आहे. त्यामुळे राजकारण केव्हा सोडू आणि केव्हा नाही, असं वाटतं” असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं, त्यामुळे नितीन गडकरींना कायमंच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT