'मुख्यमंत्री पदच काय.. शिवसेनेचं पक्षप्रमुख पद पण सोडतो', उद्धव ठाकरे गहिवरले

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. पाहा यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
'मुख्यमंत्री पदच काय.. शिवसेनेचं पक्षप्रमुख पद पण सोडतो', उद्धव ठाकरे गहिवरले
not only chief minister post also i will leave shiv sena post of party chief said uddhav thackeray(फोटो सौजन्य: CMO)

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा दिला आहे. या सगळ्या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (22 जून) थेट फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री गहिवरलेले दिसून आले.

मुख्यमंत्रीपदच काय.. माझ्या शिवसैनिकाने सांगावं मला... शिवसेना पक्षप्रमुख पद देखील सोडायला तयार आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.

अन् उद्धव ठाकरे हळवे झाले...

'माझेच लोकं म्हणत असतील काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही हवे असाल पण आम्हाला तुम्ही नकोत.. मग मला हेच म्हणायचं आहे की, समजा.. माझ्या लोकांना.. म्हणजे मी माझं म्हणतोय ते मला आपलं मानतायेत की नाही हे मला माहित नाही. कारण ते माझ्या समोर नाहीत.'

'तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा आणखी कुठे तरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं उद्धवजी.. तुम्ही कारभार करायला नालायक आहात. हे कोव्हिडच्या काळातील टॉप 5 वैगरे जाऊ दे. आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको. ठीक आहे चला मी उठतो.' असं स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

'आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो.. की, त्यांच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं की, उद्धव ठाकरे पदावर नकोत तर मी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर विश्वास नसेल तर आज संध्याकाळापासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. त्यामुळे कोणताही मोह मला खेचू शकत नाही. पण माझ्या समोर येऊन बोला.'

'उगाच काही तरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही. ही शिवसेना आमची शिवसेना वैगरे.. यामध्ये नुकसान कोणाचं होतं आहे.. या समोर बसा.. मी देतो राजीनामा.. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो आहे. जे आमदार गायब आहेत किंवा गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र राजभवनमध्ये जावं.' अशी खुली ऑफरच उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि बंडखोर आमदारांना दिली आहे.

'मी पुन्हा एकदा सांगतो की, हा अगतिकता नाही. आजपर्यंत अशी अनेक आव्हानं आपण बिनसत्तेची पेलली आहेत. हे काय मोठं आव्हान आहे. काय होईल जास्तीत जास्त.. लढू.. परत लढू.. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानाला पाठ दाखवणारा मी नाहीए.'

'हे जसं मी मुख्यमंत्री पदासाठी बोलतोय तसंच मी माझ्या शिवसैनिकांना देखील आवाहन करतो आहे. कारण का.. तर काही जणांचं म्हणणं आहे की, ही शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही. असे आरोप करत आहेत. पण या आरोपांना देखील माझ्याकडे उत्तर आहे.' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

'ज्या शिवसैनिकांना वाटत असेल की, मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे. चला.. तर मला सांगा मी हे देखील पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख पद देखील सोडायला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही. नाहीतर असे फडतूस लोकं खूप आहेत. त्यांना काही मी बांधील नाही. मी माझ्या शिवसैनिकाला बांधील आहे. शिवसैनिकांनी सांगावं.. मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे.'

not only chief minister post also i will leave shiv sena post of party chief said uddhav thackeray
महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त होऊ शकते का? काय आहेत नियम?

'मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदाने मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा.' असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

'तुम्ही या किंवा तिकडून फोन करा आणि मला सांगा की, तुमचं लाइव्ह आम्ही पाहिलं आम्हाला तिकडे यायला संकोच वाटतं. पण तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे नकोत.. हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.'

'मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदाने मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा.' असं भावनिक आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं.

'तुम्ही या किंवा तिकडून फोन करा आणि मला सांगा की, तुमचं लाइव्ह आम्ही पाहिलं आम्हाला तिकडे यायला संकोच वाटतं. पण तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे नकोत.. हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in