''बाळासाहेबांचं ते भाषण ऐकावं, शिवसेनेचा सच्चा आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार नाही''

राज्यात उद्या विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) होत आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.
''बाळासाहेबांचं ते भाषण ऐकावं, शिवसेनेचा सच्चा आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार नाही''
sudhir munangatiwar(फाइल फोटो)

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

नागपूर: राज्यात उद्या विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) होत आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीचे सर्व आमदार हॉटेलमध्ये बंद आहेत. आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावर आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीवर भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही असे म्हणत असतील तर त्यांचं काही चुकलं नाही. जनतेने त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना माझं आवाहन आहे की त्यांनी 1966 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषण केले होते, ते एकदा ऐकावे. शिवसेनेचा खरा आमदार कदापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीचे प्रेम आहे, जे बाळासाहेबांचा विचार विसरले असतील ते मात्र मतदान करतील असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

पुढे मुंनगंटीवार म्हणाले ''24 ऑक्टोबर 2019 रोजी आमच्याशी धोका झाला, मतदारांशी गद्दारी केली. आता जसे कर्म केले तसेच फळ आमदार देतील. ज्यांनी मतदारांशी विश्वासघात केला, गद्दारी केली, आता तेच लोक आमदारांना संदर्भात गद्दारी आणि धोका केल्याची गोष्ट सांगत आहेत. हा जगातील आठवा अजुबा आहे.''

'आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयसाठी निवडणूक लढवतो'

राज्यसभा निवडणुकीत भाजपने चमत्कार करत आपली तिसरी जागा निवडूण आणली आणि विधान परिषदेतही तेच होईल असे भाजपचे नेते म्हणत आहेत. यावर मुनगंटीवार म्हणाले की आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयसाठी निवडणूक लढवत आहोत. विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले आणि आमदारांच्या सद्दसद्दविवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. विधान परिषदेतही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केलेला नाही, तर अतिशय नियोजनपूर्वक आम्ही या निवडणुकीची तयारी केली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही विजय होऊ.

...या सर्वांची उत्तर संशोधनानंतर सापडतील

आमदारांच्या सदविवेकबुद्धीला चोऱ्यामाऱ्या म्हणन, डॉक्टर पेक्षा कंपाउंडर मोठा म्हणन, पाप केल्याने कोरोना होतं असं म्हणन, भाजप जिंकली मात्र त्यांचा विजय झाला नाही असं म्हणणं या सर्वांची उत्तरं हजारो वर्षांच्या संशोधनानंतर सापडतील असे म्हणत मुनगंटीवारांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in