Advertisement

अजित पवारांचं नगर पंचायत निवडणुकांवर मोठं वक्तव्य, ओबीसी आरक्षणावर म्हणाले...

नुकत्याच राज्यातील ९२ नगर परिषद आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar

बारामती: नुकत्याच राज्यातील ९२ नगर परिषद आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका (Nagar Panchayat Electio) जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आताराजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आज बारामती मध्ये सभा घेणार आहेत. त्यापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले "निवडणुका जाहिर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.

प्रत्येकाला निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सर्वत्र पाऊस चालू आहे, काळजी घेण्याचं आवाहन केलं गेलंअसताना निवडणुका जाहिर झाल्या आहेत. एकदा निवडणुका जाहिर झाल्यानंतर न्यायालयाकडूनही बदल झालेला ऐकिवात नाही” असे अजित पवार म्हणाले आहेत.

ओबीसी प्रवर्गालाही संधी मिळावी- अजित पवार (Ajit Pawar)

ओबीसी आरक्षण (OBC Reservatio) या विषयावरही अजित पवारांनी स्पष्ट मत मांडले. "इम्पेरीकल डाटा आणि बाठिया समितीचा अहवाल तयार झाला असावा, याबाबत १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रालाही न्याय द्यावा अशीमागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी प्रवर्गालाही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी हे आमचं मत आहे" असे अजित पवार म्हणाले आहेत.

मागचे दोन वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, आणि त्यावेळी राज्यावर कोरोनाचे सावट होते. आता सर्व सुरळीत सुरूझाले आहे, त्यामुळे पंढरीची वारी मोठ्या आनंदात पार पडत आहे. यावर बोलताना पवार म्हणाले " गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायीवारी झाली नाही, यावर्षी नेहमीपेक्षा जास्त वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सर्वांना सुखाचे आनंदाचे दिवस पहायलामिळावेत हे पांडुरंगाला साकडे घातले आहे. या सोहळ्यात कोणालाही काही त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असेआवाहन ही अजित पवारांनी केले आहे.

राज्यात आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? यावर अजित पवार म्हणाले "एकत्र निवडणुका लढवण्याबद्दलसोमवारी मुंबईत गेल्यावर चर्चा करणार आहे. आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी असताना जिल्हा पातळीवर निर्णयाचेअधिकार द्यायचो. जिल्हा पातळीवर पक्षीय बलाबल पाहून निर्णय घेवून कळवले जाईल".

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in