'आमचं मतदान गृहीत धरू नये'; मनसेच्या एका मताबद्दल सस्पेन्स कायम!

राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार खूप चर्चेत आले होते आणि त्यांचे मत भाजपला गेल्याची खूप चर्चा होती.
'आमचं मतदान गृहीत धरू नये'; मनसेच्या एका मताबद्दल सस्पेन्स कायम!
Raju PatilMumbai Tak

डोंबिवली : राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार खूप चर्चेत आले होते आणि त्यांचे मत भाजपला गेल्याची खुप चर्चा होती. मात्र काही वेळा पूर्वीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत विधान परिषदेच्या मतदानाबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणीही आम्हाला गृहीत धरू नये असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील हे थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत.

राज्यसभा निवडणुकीवेळी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन भाजपला मतदान करण्याती मागणी केली होती. या निवडणुकीतही प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरेंनी मला सांगितले आहे कोणाला मतदान करायचे आहे असे आमदार राजू पाटील म्हणाले त्यामुळे मनसेच्या मताबद्दल सस्पेन्स कायम आहे.

दरम्यान विधान परिषद निवडणुकीत एक-एक मताला महत्त्व आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांनीही सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत ही दोन मतं महाविकास आघाडीला मिळाली असती तर सर्व त्यांचे उमेदवार निवडणून आले असते परंतु ती मिळू शकलेली नव्हती. आता या निवडणुकीत जर मतदान करण्याची परवानगी मिळाली तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो.

दरम्यान विधान परिषदेच्या १० जागांसाठी राज्यात निवडणूक होत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपने ५ उमेदवार उतरवेल आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन उमेदवार उतरवले आहेत. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे १०व्या जागेवर कोण बाजी मारणार यांची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

टिळक, जगताप बजावणार मतदानाचा अधिकार

दीर्घकाळापासून आजारी असलेले दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप मतदान करणार आहेत. दोघांनाही गंभीर आजाराने ग्रासलं असून, ते मतदान करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, मुक्ता टिळक मतदानाला आल्या असून, लक्ष्मण जगतापही मतदान करणार आहेत. दोघांनी राज्यसभा निवडणुकीवेळीही मतदानाचा अधिकार बजावला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in