एकनाथ शिंदेंच्या बंडाचे दिग्दर्शक उद्धव ठाकरे?; संजय राऊतांनी दिले स्पष्ट उत्तर...

एकनाथ शिंदे आपल्यासोबत शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक घेऊन गेले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या बंडाचे दिग्दर्शक उद्धव ठाकरे?; संजय राऊतांनी दिले स्पष्ट उत्तर...
Eknath Shinde | Uddhav Thackeray@Twitter

मुंबई: धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले आणि राजकारणात दिघेंना आणि बाळासाहेबांना आपला गुरु मानणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबतच बंड केले. ठाणे जिल्ह्याच्या बाहेर फारसा प्रभाव नसलेले, आणि शिवसेनेतील शांत नेते असलेले एकनाथ शिंदे ३५ आमदारांना सोबत घेऊन गुवाहटीला मुक्कामी आहेत. आता सर्व स्तरातून ही उद्धव ठाकरेंची तर खेळी नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.

सोशियल मीडियावरती लोक अशा चर्चा करत आहेत. कारण एकनाथ शिंदे आपल्यासोबत शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक घेऊन गेले आहेत. एवढ्या मोठ्या कट्टर शिवसैनिक पक्षासोबत गद्दारी कशी करतील असा सवाला ही विचारला जात आहे. त्यामुळे या सर्व बंडाचे दिग्दर्शक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत का? असा सवाल सोशियल मीडियावरती विचारला जात आहे.

हा प्रश्न विचारण्यामागचे कारण असे की रात्री सर्व आमदार उद्धव ठाकरेंना भेटतात आणि पहाटे थेट गुजरातमध्ये दिसतात आता हे आमदार आणि मंत्री स्वत:हून गेले की त्यांना पाठवले गेले असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचे दिग्दर्शक उद्धव ठाकरे आहेत का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारले असता त्यावर राऊतांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. ''पाठीमागून वार करण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभाव नाही, समोरासमोर ते लढत असतात. त्यामुळे अशा चर्चांत काहीही अर्थ नाही'' असे संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडाला ठाकरेंची साथ? सोशियल मीडियावर उपस्शीत केले जाणारे मुद्दे

* राज्यात अनेक शिवसेना नेत्यांनरती ईडी, सीबीआय, आयटीची कारवाई सुरु आहे, या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी भाजप-शिवसेना युती.

* आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपलीच सत्ता राहावी यासाठी भाजपसोबत युती.

* या सर्वांसाठी एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याचा वापर केला जातोय.

* राष्ट्रावादीला अडीच वर्षांनतर मुख्यमंत्रापद देण्यापेक्षा भाजपसोबत युती करुन तिकडून उपमुख्यमंत्री पद घ्यावे.

* भाजपसोबत युती केल्यास केंद्रात मंत्रीपद, राज्यात जास्त मंत्रीपदं मिळतील.

* शिवसेनेची हिंदूविरोधी तयार झालेल्या भूमिकेत बदल होईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in