संजय राऊतांना दुसऱ्यांदा दिलासा; जामीनावरील स्थगितीची मागणीही न्यायालयाने फेटाळली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत अखेर तुरुंगातून बाहेर येणार, हे आता स्पष्ट झालं आहे. पीएमएलए न्यायालायने राऊत यांच्या जामीनावर स्थगिती देण्याची ईडीची मागणीही फेटाळून लावली आहे. आज संध्याकाळपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्यास राऊत आजचं बाहेर येऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संजय राऊत यांना बुधवारी दुपारी जामीन मंजूर करण्यात आला होता. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र ईडीकडून राऊत यांच्या जामीनाला विरोध करण्यात आला होता. तसंच आपल्याला उच्च न्यायालायत जायचं आहे, असं सांगत ईडीने जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र पीएमएलए न्यायालयाने राऊतांचा जामीन कायम ठेवतं त्यांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, राऊत यांच्या जामीनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोटात आनंदाचं वातावरण आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की मै झुकुंगा नहीं. मी काहीही झालं तरी झुकणार नाही असं म्हटलं होतं. ते शेवटपर्यंत लढले. आज त्यांच्या भूमिकेचा विजय झाला आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आहे असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं आहे?

सुषमा अंधारे यांनी टायगर इज बॅक असं म्हणत ट्विट केलं आहे.सुषमा अंधारे या शिवसेनेतल्या फायर ब्रांड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आता त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच सूचक आहे।

    follow whatsapp

    ADVERTISEMENT