"भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

राज ठाकरेंनी ट्विट केलेल्या पत्राचं तिसरं पान चर्चेत
"भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भूमिका घेतली. गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत त्यांनी हा मुद्दा बाहेर काढला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. ज्यानंतर राज ठाकरेंनी १२ तारखेला उत्तर सभा घेतली. ठाण्यातल्या सभेतही त्यांनी ३ मे पर्यंत भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता.

"भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
राज ठाकरे म्हणाले 4 तारखेनंतर ऐकणार नाही, अन् मुस्लिम पदाधिकार्‍यांचे राजीनामा झाले सुरु

१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणातही त्यांनी हाच अल्टिमेटम दिला होता. आता आज राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी केलेलं भाषण चिथावणीखोर होतं असं सांगत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात राज ठाकरे यांनी आजच आपली भूमिका स्पष्ट करणार हे सांगितलं होतं. ही भूमिका त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. या पत्राच्या तिसऱ्या पानावर त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.

राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

काय म्हणाले आहेत राज ठाकरे?

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की कै. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे.

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावं. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे आणि बाळासाहेबांचं ऐकणार आहात की नाही याचा फैसला लावा असंही म्हटलं आहे.

"भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
भोंग्याचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू द्या ! राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

आणखी काय म्हणाले आहेत राज ठाकरे?

सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनात राज ठाकरेंनी सावध भूमिका घेत मनसे कार्यकर्त्यांना थेट आदेश देण्याऐवजी हिंदू नागरिकांना भोंग्यांविरुद्ध भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. 4 मे रोजी जिथे यांचे भोंगे अजान आणि बांग देतील तिकडे आपण भोंग्यावर हनुमान चालीसा लावावी. भोंग्याचा काय त्रास होतो हे त्यांनाही समजू द्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी तीन पानी पत्रात आपली जाहीर भूमिका मांडून हिंदू जनतेला आवाहन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या डेसीबल बद्दल घालून दिलेल्या नियमांचा दाखला देत राज ठाकरे यांनी मनसेने उचललेला हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. बहुतांश मशिदी अनधिकृत असताना सरकार त्यावर भोंगे लावायला परवानगी का आणि कशी देते? भोंग्यांमुळे होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास हा देशातील सर्वधर्मीयांना होतो. ही बाब प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं, वाहतूक कोंडी करणं हे कोणत्या धर्मात बसतं असा सवाल राज ठाकरेंनी आपल्या पत्रात विचारला आहे.

Related Stories

No stories found.