Raj Thackeray: ...तर संभाजीनगरमध्ये भयानक घटना घडली असती: राज ठाकरे - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Raj Thackeray: …तर संभाजीनगरमध्ये भयानक घटना घडली असती: राज ठाकरे
बातम्या राजकीय आखाडा

Raj Thackeray: …तर संभाजीनगरमध्ये भयानक घटना घडली असती: राज ठाकरे

मुंबई: ‘मला जर प्रकरण भडकवायचं असतं तर ते संभाजीनगरलाच भडकलं असतं. भाषणावेळी प्रकरण काय लेव्हलला गेलं असतं सांगा..’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

मला राज्यातील शांतता बिघडवायची नाही. त्यामुळेच संभाजीनगरला माझ्या भाषणावेळी बांग झाली तेव्हा मी हे प्रकरण पोलिसांना सांगितलं. असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्याला राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा काही हेतू नसल्याचं म्हटलं आहे.

पाहा मनसे अध्यक्ष नेमकं काय म्हणाले संभाजीनगरमधील त्या घटनेविषयी:

‘मी काल पण सांगितलंय आणि पुन्हा सांगतोय. हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नाही. याला धार्मिक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. आमची अजिबात इच्छा नाही की, महाराष्ट्रातील, देशातील शांतता बिघडावी, दंगली घडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.’

‘तुमच्या जर लक्षात असेल तर परवा दिवशी माझ्या संभाजीनगरला भाषण चालू असताना ज्यावेळेला तिकडे बांग दिली गेली त्यावेळी मी हे पोलिसांना सांगितलं. अन्यथा ते जर भडकवायचं असतं तर तिथे काय लेव्हलला प्रकरण गेलं असतं सांगा..’

‘आम्ही ही गोष्ट शांततेमध्ये समजून सांगतोय. सरकारने देखील ही गोष्ट ऐकावी, समजून घ्यावी. आता त्या आमच्या लोकांची धरपकड.. कशासाठी धरपकड करताय? मोबाइलच्या काळात? म्हणजे कम्युनिकेशनची साधनं एवढ्या वाढलेल्या आहेत. तुम्ही माणसं पकडून काय होणार आहे. काय लागणार तुमच्या हाती.’

‘हे अजून 60-70 च्या दशकातला विचार करतायेत का? की, राज ठाकरेचं भाषण सुरु झाल्यावर तिकडी वीज बंद करा. अरे वीज काय बंद करायची मोबाइलवर दिसतं की भाषण. इतका मूर्खपणा.. हे कुठच्या काळात आहेत.’

‘मला हेच सांगायचं आहे की, हा काही एक दिवसाचा विषय नाही. हिंदू बांधवांना हेच सांगायचं आहे. हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या-ज्या मशिदीमधील मौलवी ऐकणार नाहीत. जिकडे लाऊडस्पीकर लागतील तिकडे त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागला गेला पाहिजे.’

‘मुंबईचे पोलीस 135 मशिदींवर काय कारवाई करणार हे एकदा समजू देत. ते त्यांच्या धर्माला जर घट्ट असतील तर आम्हाला पण आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. या सगळ्याचा पोलिसांनी विचार करावा. मला असं वाटतं की, महाराष्ट्रात शांतता नांदावी, लाऊडस्पीकर बंद व्हावेत. जेव्हा तुम्हाला सणासुदीला लागतात तेव्हा हरकत नाही. पण 365 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार-पाच वेळा जर बांग ऐकवणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय.’

‘याचा महिलांना, विद्यार्थ्यांना, रुग्ण यांना त्रास होतो. एवढं पण समजत नाही. म्हणजे यांचा धर्म मोठा माणुसकीपेक्षा? परंतु मी परत सांगेन आपल्याला ज्या मशिदीवरचे सकाळचे अजान झाली नाही त्यांनी देखील यापुढे प्रार्थना म्हणायची असेल एक तर पोलिसांनी हे भोंगे खाली आणावेत. काय प्रार्थना करायची असेल ती मशिदीत करा. हे आवाज बंद झाले पाहिजेत एवढीच मी अपेक्षा करतोय.’

‘परत एकदा सांगतोय हा विषय एक दिवसाचा नाही. हा विषय फक्त 4 तारखेचा नाही. हा कायमस्वरुपी राहणार. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोवर.’ असं म्हणत राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर कायम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 5 =

वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार? Anil Ambani यांची फिल्मी लव्हस्टोरी! जेव्हा कुटुंबाच्या विरोधात गेले तेव्हा… Reham Khan : इम्रान खान यांच्या EX पत्नीचं तिसरं लग्न, पतीसोबत रोमँटिक अंदाज! तुम्हाला ‘या’ सवयी असतील, तर मुलांवर होईल वाईट परिणाम; वेळीच सावध व्हा! फिटनेस फ्रीक Shilpa Shetty मुलांसोबत मस्ती करताना थकली! यूजर्स म्हणाले.. मालदीवमध्ये Rinku Singh चा स्टायलिश लुक! 6 पॅक अ‍ॅब्सवर सर्वांच्या खिळल्या नजरा! Balasore Train Accident : विरेंद्र सेहवाग ‘त्या’ मुलांचा होणार पालक, केली मोठी घोषणा IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण! कतरीना कैफची ‘ही’ सवय आवडत नाही, विक्की कौशलचा खुलासा WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार गोलंदाज बाहेर रेल्वे रूळांमध्ये किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय? बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ! Train accidents : ‘या’ अपघातांनी अवघा भारत हादरला होता, तुम्हाला किती माहितीये? एका Video Call मुळे व्यक्तीला 5 कोटींचा गंडा! चुकूनही ‘हे’ नका करू Mukesh Ambani यांची गोंडस नात!.. घेतलं कुशीत; क्यूट Photos Viral तुमचं मूलही मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार.. Adah Sharma : ‘नाकाची सर्जरी करून घे’, जेव्हा अभिनेत्रीला दिला होता सल्ला; म्हणाली..