Exclusive: 'राज ठाकरेंनी अयोध्येत येऊन दाखवावं, बघा कसं त्यांचं 'स्वागत' करतो', ब्रिजभूषण सिंहांचं खुलं आव्हान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खुलं आव्हान देताना ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले? पाहा ही Exclusive मुलाखत.
Exclusive: 'राज ठाकरेंनी अयोध्येत येऊन दाखवावं, बघा कसं त्यांचं 'स्वागत' करतो', ब्रिजभूषण सिंहांचं खुलं आव्हान
raj thackeray should come to ayodhya bjp mp brijbhushan singh open challenge

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जेवढ्या ताकदीने अयोध्येत येतील तेवढ्याच ताकदीने आम्ही त्यांना विरोध करु. अयोध्येत यायचं असेल तर त्यांनी बिनशर्त माफी मागावी उत्तर भारतीयांची नाही तर त्यांना रोखण्यासाठी मी सक्षम आहे. असं खुलं आव्हान भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिलं आहे.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मुंबई Tak सोबत खास बातचीत केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी माफी न मागता अयोध्येत घुसूनच दाखवावं असं आव्हान दिलं आहे.

मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले:

'जेव्हापासून हे उत्तर भारतातील कामगारांची, टॅक्सीवाले, फेरीवाले यांना अपमानित करत आले आहेत तेव्हापासून हा त्यांच्याविरोधातील माझा स्टँड आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे की, जर त्यांना अयोध्येत यायचं असेल तर मला काहीही आक्षेप नाही. पण उत्तर भारतीयांना त्यांनी जी काही वागणूक दिली आहे त्याबाबत जर त्यांनी माफी नाही मागितली तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही.'

'मी कार्यकर्ता असण्याच्या आधी उत्तर भारतीय आहे. उत्तर भारतीयांना अपमानित करण्याचं जे काम यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांनी माफी नाही मागितली तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही.'

'माझ्यासोबत अनेक प्रत्येक उत्तर भारतीय आहेत. पुढे पाहा काय-काय होतं ते.. त्यांना येऊ द्या एकदा.. एवढं शानदार स्वागत करेन की, जगही पाहत राहिल.'

'जोवर हे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत यांना घुसू देणार नाही. मी सक्षम आहे. माफी मागावी आणि मग इथ खुशाल यावं.'

'योगीजी चांगले आहेत तर त्यांचं कौतुक करतीलच ना.. पण 2008 सालापासून त्यांनी जी मारहाण केलीय. ते घाव कसे भरुन येतील? त्यासाठी किमान माफी तर मागितलीच पाहिजे. हे आंदोलन फक्त राज ठाकरेंविरोधात आहे.'

'जेवढ्या ताकदीने ते येतील तेवढ्याच ताकदीने आम्ही त्यांचं स्वागत करु.. जेवढे ढोल वाजवत ते येतील तेवढेच ढोल वाजवत आम्ही त्यांना रोखू. आम्हाला एवढ्या हलक्यात घेऊ नये. जे त्यांनी पेरलं ते आधी कापावं लागेल. जे द्वेषाचं बीज पेरलं आहे ते कापावंच लागेल.'

'53 वर्षांपासून कुठे होते हे.. का आले नाही तोवर अयोध्येला? हे 53 वर्षांचे झाले. पण कधी अयोध्येत आलेत का?'

'माझा विरोध हा फक्त राज ठाकरेंनाच आहे. जिथवर मला माहिती आहे तसं उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे कधीही उत्तर भारतीयांसोबत अशा व्यवहार कधीच केला नाही जसा त्यांनी केला होता.'

'एकीकडे तुम्ही आम्हा रामाचे वंशज असणाऱ्या लोकांना मारहाण करणार, कामगारांना मारहाण करणार... आणि त्यांच्याच पूर्वजांना तुम्ही भेटायला येणार आहे.'

raj thackeray should come to ayodhya bjp mp brijbhushan singh open challenge
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांचं डी-गँगशी जोडलं गेलं होतं नाव, जाणून घ्या...

'त्यांच्या हिंदुत्वाबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण त्यांनी माझ्या लोकांना त्यांनी मारलं होतं. त्यामुळे माफी मागत नाहीत तोवर येऊ देणार नाही. मी सक्षम आहे.. त्यांना सांगा..' असं म्हणत ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर आपण त्यांना रोखणारच अशी भूमिका घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in