"माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलण्याचा शहाणपणा..." राज ठाकरेंचा मनसैनिकांना खरमरीत इशारा

जाणून घ्या राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
"माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलण्याचा शहाणपणा..." राज ठाकरेंचा मनसैनिकांना खरमरीत इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. मात्र याबाबत त्यांनी ट्विट केलेलं एक पत्र चांगलंच चर्चेत आहे. तसंच नितीन सरदेसाई यांनीही जबाबदारीने वागा असं पक्षातल्याच कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आधी नितीन सरदेसाई यांनी ट्विट केलेलं पत्र आणि आता राज ठाकरेंनी ट्विट केलेलं पत्र या दोहोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी पत्रात?

"माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये. तसंच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कुणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे. तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र! " असं म्हणत राज ठाकरेंनी खरमरीत बोल कार्यकर्त्यांना सुनावले आहेत.

काय म्हटलं आहे नितीन सरदेसाईंनी?

"महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रवक्ते करत असतात. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रवक्त्यांशिवाय इतर कुणीही प्रसारमाध्यमांसमोर राजकीय भूमिकांबाबत भाष्य करू नये. तसंच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर किंवा अन्यत्र कुठेही राजकीय राजकीय टीका टिपण्णी करताना भाषेचे भान बाळगावे.पक्षस्थितीचे पालन प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला करावंच लागेल, अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल."

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह या भाजप खासदारने विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. मराठी माणसाचं प्रेम दाखव असताना राज ठाकरेंमुळे अनेक उत्तर भारतीयांनी खाल्ला आहे त्यामुळे मी त्यांचा विरोध करतो आहे असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. Tv9 मराठीला दिलेल्या भूमिकेत त्यांनी ही भूमिका मांडली त्यांना वसंत मोरे यांनी उत्तर दिलं. या सगळ्या प्रकारानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहून खरमरीत इशारा दिला आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

कोरोना काळात जेव्हा उत्तर भारतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जायचं होतं तेव्हा आम्ही त्यांना राज्य कुठलं हे विचारलं नाही. आम्ही मनसेने भूमिका मांडली. आम्हाला जर कुणी हा इशारा देत असेल की राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही, पाऊल टाकू देणार नाही असं म्हणणार असाल तर असं होणार नाही. महाराष्ट्रात जे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांची सभा होणार आहे. जर बृजभूषण सिंह आव्हान देत असतील, वाद निर्माण करत असतील तर साहेब त्यावर उत्तर देतील. आम्हीही मराठी आहोत, आम्हाला राज्याचा, मराठी माणसाचा अभिमान आहे. राज ठाकरे हे जर अय़ोध्येला जाणार असतील तर त्यावर विरोध करण्याचं कारण काय? राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत ते रामचंद्रांच्या दर्शनाला जाणार आहे. राज ठाकरेंना राजकारण आठवलंय म्हणून ते अयोध्येला जात नाही. पक्षाची भूमिका आहे ती जबाबदार लोक सांगतील. ५ जूनला राज ठाकरे जाणार म्हणजे जाणारच. योगी आदित्यनाथांचं सरकार त्या ठिकाणी आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यावर योग्य ती भूमिका ते घेतील. बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात राजकारण दिसतं आहे. त्याचा काय समाचार घेतील. पक्षाचे लोक त्याबद्दल काय ते ठरवतील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in